माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन

माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा शहरात प्रधानमंत्री जन औषध योजनेच्या मार्फत गांधी उद्यान बगिच्या समोर जन्नत जेनेरिक औषधाच्या दुकानाचे  उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन औषधि योजनेमार्फत वरोरा शहराच्या मध्यभागात जन्नत जेनेरिक औषधि केंद्र उभारण्यात आले असून याचे उद्घाटन भाजपा चे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी उद्घाटन केले. यावेळी ते केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनेबद्दल बोलत होते. सर्वसामान्यांना या औषधी चा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून डॉक्टरच्या सल्ल्याने या औषधाचा वापर करावा जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीला कमी दरात चांगल्या प्रतीचे औषधी प्राप्त होईल. या औषधी गुणवत्ता प्राप्त असून कोणाचीही पेटंट नसलेले औषध असल्याने सर्वसामान्य व्यक्तीला 80 टक्के पर्यंत कमी किमतीत जेनेरिक औषध प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कोणीही याचा अपप्रचार करू नये . असे मत माजी मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

परंतु भारतात जेनेरिक औषधालय सुरू झाले असून आज पर्यंत ही औषधे लिहून देणारे डॉक्टर्स किंवा तत्सम यंत्रणा कोणत्याही शहरात नसल्याने गरीब लोकांपर्यंत ही औषधे पोहोचू शकली नाही. अशी खंत गरीब लोकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता लवकरच सरकार या संदर्भात पाऊल उचलेल अशी सकारात्मक भूमिका मंत्र्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय राज्य गृहमंत्री हंसराज अहिर, सोबत माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, बाबा बागडे, ओम मांडवकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments