घरासमोर वादातून चुलत भावाने सायकलने हल्ला; जखमीची पोलिसांत तक्रार

घरासमोर वादातून चुलत भावाने सायकलने हल्ला; जखमीची पोलिसांत तक्रार बातमी:6/5/26 वरोरा : शहरातील राजीव गांधी वार्ड परिसरात घरासमोर झालेल्या वादातून चुलत भावाने सायकलने डोक्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासीर अहमद शेख (वय ४५, रा. राजीव गांधी वार्ड, वरोरा) हे मजुरीचे काम करतात व कामानिमित्त हैद्राबाद येथे जात असतात. ११ एप्रिल रोजी ते घरी परत आले होते. ४ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास ते घरासमोर उभे असताना त्यांचा चुलत भाऊ इस्ताक मुस्ताक शेख (वय ३५, रा. कर्मवीर वार्ड, वरोरा) तेथे आला. घराकडे वारंवार येण्याबाबत विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान इस्ताक शेख हा मद्यधुंद अवस्थेत असून त्याने भावाच्या पत्नी संबंधित आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा आरोप आहे. त्यानंतर त्याने जवळ पडलेली लहान सायकल उचलून नासीर शेख यांच्या डोक्यावर मारली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांनी तत्काळ दवाखान्या...

वरोरा नगर परिषद क्षेत्रातील वाढीव पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करा*

*वरोरा नगर परिषद क्षेत्रातील वाढीव पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करा*
*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक*

वरोरा :  शहरातील अस्तित्वातील योजना सन १९७२ पासून कार्यान्वित असून प्रकल्पातील लोकसंख्या २२ हजार ४०० साठी सन २००२ पर्यंत होती. योजनेचे आयुष्य ४८ वर्ष झालेले आहे. वरोरा शहराची सन २०११ ची लोकसंख्या ४६ हजार ५३२ एवढी असून शहराचे आधुनिकीकरण व औद्योगीकरण वसाहतीमुळे पाणी पुरवठा मागणी वाढलेली असल्याने नगर परिषद वरोरा यांच्या मागणीनुसार वाढीव पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.    

                      या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नागपूर मुख्य अभियंता सुशीर जी, एम. आय. डी. सी. अधीक्षक अभियंता आकुलवार, एम. आय. डी. सी. कार्यकारी अभियंता कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, नगर परिषद वरोरा मुख्य अधिकारी भोयर, कार्यकारी अभियंता बालधारे, जी. एम. आर व साई वर्धा येथील अधिकारी व नगरसेवक राजू महाजन यांची उपस्थिती होती. 

                         या बैठकीत साई वर्धा, जी. एम. आर कंपनीने मरडा बॅरेजचे पाणी वरोरा नगर परिषद क्षेत्रातील वाढीव पाणीपुरवठा योजनेस देऊन हि योजना त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केल्या. हि योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळेल. सद्य बहुतेक ठिकाणी ट्युब्वेलने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हि बहुप्रतीक्षित वाढीव पाणीपुरवठा योजना लवकरच सुरु होणार आहे.

Comments