चंद्रपूर जिल्हा बँक शेतकरी कल्याण निधी अंतर्गत शेतकरी शेतमजूर यांना धनादेशाचे वितरण

चंद्रपूर जिल्हा बँक शेतकरी कल्याण निधी अंतर्गत शेतकरी शेतमजूर यांना धनादेशाचे वितरण
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते मदतीचा धनादेश वितरीत

वरोरा(प्रतिनिधी) :       
       
               शेतकऱ्यांच्या हक्का साठी नेहमी तत्पर राहणारी जिल्हा बँक शेतकऱ्याचा सुखा दुःखात संकटात नेहमी धावून आली आहे. जिल्हा बँकेच्या  'शेतकरी कल्याण नीधी' योजनेअंतर्गत गरजु, निराधार, शेतकरी, शेतमजुरांना नुकसान भरपाई देवून दातृत्व जपत आहे.
            वरोरा तालुक्यातील टेमुर्डा या शाखेतर्गत येणाऱ्या कोंढाळा या गावातील शेतकरी रवींद्र ऋषी अहिरकर यांच्या गोठा जळून जनावरांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्यात त्यांचे फार मोठे नुकसान झाले, शंकर रामभाऊ शेंडे मुक्काम बोरगाव यांचे राहते घर जळलेले आहे तसेच तळेगाव येथील सुरेखा भारत गाते यांच्या पतीचे अपघातात निधन झाले त्यामुळे त्यांना एक हात मदतीचा म्हणून बँकेतर्फे धनादेश देण्यात आला. तसेच पाचगाव येथील मारोती शंकर कोडापे यांच्या मुलाचा डुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर वसंता नागोजी जेणेकर, व लालबा पैका मारेगामा यांच्या बैलाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यामुळे त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. 
               चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरोरा शाखेच्या सौजन्याने बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत  सहकार्याने व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते पिढीत शेतकरी यांना बँकेचे 'शेतकरी कल्याण नीधी' योजनेअंतर्गत मदतीचा धनादेश वितरीत करण्यात आला. 
 यावेळी दत्ताभाऊ बोरेकर, संचालक कृ. उ.बा.समिती वरोरा
जयंत टेमुर्डे, विठ्ठल टाले, बाळू भोयर, युवराज इंगळे, अभिजित पावडे, पवन महाडिक, विलास कुमरे, अनिल कुमरे, सचिन चुटे, महादेव जीवतोडे, गजानन जीवतोडे,शरद नक्षीने, राहुल बलकी, अमोल बावणे,  अभिजित  पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
  यावेळी रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या योजनांचा सर्वानी लाभ घ्यावा तसेच ट्रस्ट मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Comments