शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्या करिता आमदार शेतकऱ्यांच्या दारी
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असते
असेच वरोरा तालुक्यातील कोंडाळा येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले ही बाब आमदार प्रतिभा धानोरकर यांना माहीत होताच त्यांनी थेट शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्या करिता शेतकर्याच्या दारी पोहोचून त्यांचे सांत्वन करीत आर्थिक मदत दिली
वरोरा तालुक्यातील कोंडाळा येथील शेतकरी रवींद्र ऋषी अहिरकर यांच्या शेतातील गोठ्यात अचानक आग लागली गोठ्यात असणारे बैल गाय इतर पाळीव प्राणी शेती उपयोगी साहित्य रासायनिक खत जळून खाक झाले यामध्ये शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले ही बाब आमदार प्रतिभा धानोरकर यांना समजतात त्यांनी स्वतः शेतकऱ्याच्या घरी जाऊन आर्थिक मदत दिली तसेच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर शेतकऱ्यास शासनातर्फे आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे कार्य शेतकऱ्यांच्या प्रति उल्लेखनीय असून कार्याची प्रशंसा केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे उपसभापती देवानंद मोरे संचालक संजय घागी संचालिका तसेच जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोडे बाजार समिती सचिव चंद्रसेन शिंदे सहाय्यक सचिव सचिन डहाळकर लिपिक श्रीकांत ता टे वार सरपंच रवींद्र भोयर ग्रामपंचायत सदस्य अविनाश पायगन लक्ष्मण दवरे अस्मिता देवतळे निवृत्त शिक्षक मुकिंद वाघ भानुदास बोधा ने पोलीस पाटील पांडुरंग देवतळे नितीन लोंढे संजय शेर कुरे चंद्रभान काकडे सतीश देवतळे आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment