वरोरा स्वामी जींनीग येथे कापुस भाव 12 हजार 501 रुपये.

वरोरा स्वामी जींनीग येथे कापुस भाव 12 हजार 500 रुपये.
वरोरा 
चेतन लूतडे

आज मंगळवारी 29तारखेला कापसाचे भाव खुलताच वरोरा येथील स्वामी कॉटन जिनिंग मालक संजय छलानी यांनी कापसाचा भाव 12501 रू पर क्विंटल दिल्याने शेतकरी आनंदात आहे. आज सुधाकर बोधने यांना बारा हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल कापसाचा भाव दिल्याने बरेच शेतकऱी आनंदी झाले आहे.
मागील काही दिवसांपासून वरोरा तालुक्यातील स्वामी कॉटन जिनिंग मालकांनी बाजार भावाप्रमाणे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना भाव दिल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शेतकरी आपला कापूस या ठिकाणी रांगेत लावण्याचा प्रयत्न करत आहे. वरोरा तालुक्यातील सहा जिनीग पैकी सर्वात जास्त भाव देणारे यावर्षीचे स्वामी कॉटन जिनिंग असून कृषी उत्पन्न बाजार समितीने या व्यापाऱ्याचे धन्यवाद व्यक्त केले आहे. 
 हिंगणघाट येथे कापसाचा भाव बारा हजार सातशे रुपये पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे बाकीच्या जिनिंग मालकांनी सुद्धा या प्रमाणात भाव दिल्यास या परिसरातील शेतकरी सुखावला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मात्र वरोरा तालुक्यातील काही एकाधिकारशाही असलेल्या अडत्यामार्फत कापसाचे भाव 7500 पर्यंत थांबवून धरले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Comments