आज वरोरा येथे शंकर जी च्या मूर्तीची शोभायात्रा व प्रतिष्ठापना
वरोरा : येथील आठवडी बाजार परिसरातील ३५ वर्षापासून असलेल्या श्री शंकर भगवानांच्या मूर्तीची १६ फेब्रुवारी रोजी विटंबना करण्याचा प्रकार घडला होता. सदर खंडित मूर्तीचे विसर्जन करून त्या जागेवर नवीन मूर्तीची महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर २८ फेब्रुवारी रोजी स्थापना रात्री बाराच्या सुमारास प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्याआधी सदर मूर्तीची दुपारी ३ वाजता शहरातील प्रमुख मार्गांवरून ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
वरोरा येथील आठवडी बाजार परिसरात ३५ वर्षा पूर्वी शंकरजीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. दि.१६ फेब्रुवारी रोजी सदर मूर्तीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. यामुळे शहरातील हिंदू संघटनांतर्फे संताप व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी वरोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत मूर्तीची विटंबना करणाऱ्या ईसलाख मुस्ताक शेख ३५ वर्ष रा.कॉलरी वॉर्ड वरोरा या आरोपीला अटक करून नायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
दरम्यान हिंदू संघटनांनी पुढाकार घेऊन सदर खंडित मूर्तीचे विधीवत पूजन केले आणि विसर्जन केले. आणि महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर त्या जागी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविण्यात आले होते. यासाठी राष्ट्रीय हिंदू मंच व महादेव देवस्थान कमिटी आणि शहरातील इतर हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. त्याआधी दुपारी ३ वाजता ढोल ताशांच्या गजरात सदर मूर्तीची भव्य शोभायात्रा वरोरा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढली जाणार आहे. या शोभायात्रेत बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान आयोजक हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment