प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा दूचाकी सोबत अपघात

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा दूचाकी सोबत अपघात


 वरोरा 15/2/22
चेतन लूतडे

वणीकडे  वंधली , माढेळी  मार्गे जाणाऱ्या कोळशाचा ट्रक व मोटरसायकलचा आज दुपारी अपघात झाला असून सदर अपघातात एकोना  येथील  निखाडे नामक एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ड्राइवर फरार झाला असल्याने  गावकऱ्यांमध्ये संतापा ची लाट पसरली आहे.
  मागील दोन महिन्यापासून वणी  येथील कोळसा  साईड वर जाणाऱ्या हजारो टन कोळशाची वाहतूक एकोना खाणीतून  सुरू आहे. सदर वाहतूक वरोरा ते माढेळी मार्गे  वनी येथे होत आहे. 
    आधीच वरोरा ते माढेळी रोड इतका खराब झाला असताना त्याच रोड वरून  कोशाची अवजड वाहतूक सुरू आहेत त्यामुळे येथील सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. 

  आज कोळसा खदान येथून निघालेली ट्रक  ( क्रमांक एम. एच. ३४ ए. बी. ६७१०) एकोना गावाकडे कडे जाणाऱ्या मोटरसायकल ला धडक दिल्याने निखाडे नामक महिला गंभीररित्या जखमी झाली व तिला उपचारार्थ चंद्रपूर येथे नेण्यात आली असल्याचे कळते.  




Comments