माफी मांगो मोदीजी

*माफी मांगो मोदीजी* 

 *_वरोरा काँग्रेसतर्फे धरणे,निषेध आंदोलन_* 


*वरोरा:* 
महाराष्ट्र काँग्रेसमुळे कोरोणा पसरला असा खोटा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वरोरा काँग्रेसतर्फे धरणे देऊन घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
          डाॅ. आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. नरेंद्र मोदींनी लोकसभेतील आपल्या भाषणात महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास टिपले म्हणाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे, वरोरा काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, असंघटित कामगार संघटनेचे प्रदेश सचिव छोटूभाई शेख, तालुका सचिव मनोहर स्वामी, प्रविण काकडे,राजु महाजन, ॲड.प्रदीप बुरान, निलेश भालेराव, सलीम पटेल, राहुल देवडे,सुभाष दांदळे,पराग नरडे, शैलेश पदगिरवार,निखील मांडवकर, निसार पठाण, 
महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रत्नाताई अहिरकर, शहराध्यक्ष दिपाली माटे, प.स.ऊपसभापती संजीवनी भोयर , सरपंचा यशोदा खामनकर, शिरोमणी स्वामी,चेतना शेट्टे ,मीना रहाटे, अंजु भोयर,मंगला पिंपळकर, उज्ज्वला थेरे,शुभांगी दातारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 'माफी मांगो,मोदीजी माफी मांगो' ,  'महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदी यांचा निषेध असो' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Comments