पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यात यश; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष

पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यात यश; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष टिळकवार्ड,वरोरा, दि. २४ मार्च : शहरातील टिळकवार्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात फिरायला जाणारे नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी हॉटेलवरून येणाऱ्या व्यक्तींना व रहदारी करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर गेल्या रविवारी वैभव किराणा दुकानाजवळ फिरत असलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याला नागरिकांनी मारून टाकले. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून हा कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांना चावा घेत होता. पंधरा ते वीस व्यक्तींना व लहान मुलांना गंभीर जखमी केल्याने परिसरात लहान मुलांना खेळणेही अवघड झाले होते. विशेष म्हणजे या कुत्र्यांच्या शरीरावरील कातडी गळून पडल्यासारखी दिसत असून, त्यांना आजार झाले असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड असून, अशा कुत्र्यांमुळे एखाद्या लहान मुलावरही हल्ला होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, अद्यापही नगरपालिका प्रशास...

भद्रावती :- खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते विकास कामचे भूमिपूजन

विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
भद्रावती , रवी बघेल 5Feb2022

खासदार बाळु भाऊ धानोरकर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक पाच फरवरीला भद्रावती तालुक्यात पार पाडला जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर सन 2021-22 अंतर्गत.रुग्णालय भद्रावती येथे खासदार च्या हस्ते ऑक्सीजन प्लांट चे उद्घाटन करण्यात आले.
भद्रावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील पादन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे याचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले .
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळु भाऊ धानोरकर तर भूमिपूजन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर अध्यक्ष अनिल धानोरकर मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर तालुकाप्रमुख प्रशांत काळे शहर प्रमुख सुरेश गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते

Comments