महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे चंद्रपूर जिल्ह्यात जंगी स्वागत

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे चंद्रपूर जिल्ह्यात जंगी स्वागत
काँग्रेसच्या भव्य कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन .

चेतन लूतडे
वरोरा27/2/22

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा व चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वरोरा शहरात आगमन होताच जंगी स्वागत कार्यकर्त्यां तर्फे करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी बॅनर पोस्टर व फटाक्यांची आतिषबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महसूल मंत्र्यांचे मन जिंकले. वरोरा येथील खासदार धानोरकर दाम्पत्याच्या घरी भेट देऊन चंद्रपूर साठी पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर ,आमदार प्रतिभाताई धानोरकर, आ. अभिजित वंजारी, सह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यादरम्यान भद्रावती येथील चौकात मंत्र्यांचे स्वागतानंतर 

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर नियोजित स्थळावर काँग्रेसच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात महसूल मंत्र्यांनी संबोधन केले.यादरम्यान  जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पक्ष वाढीसाठी काम करावे अशा सूचना मंत्र्यांकडून देण्यात आल्या. आघाडी सरकारने दोन वर्षाचा कठीण काळ काढला असून उर्वरित राहिलेले कामे सरकार नक्कीच पार पाडेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कोरोना काळात महा विकास आघाडी सरकारने लोकांना काळजीपूर्वक मदत केली, आकडे लपवण्याचे काम केले नाही. मात्र ज्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या स्मशानभूमीत ते उघडे पडले. मृतदेह नदीत वाहत असताना जनतेने पहिले. असा टोला विरोधी पक्षाला मारला.
महा विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही ते म्हणाले. येणार्या नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीत  जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोठा संख्येने सदस्य निवडून द्यावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.


या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments