राजकारणातील हेवेदावे बाजूला सारुन गावाचा विकास साध्य करावा - रविंद्र शिंदे यांचे प्रतिपादन
वरोरा (प्रतिनिधी) :-11/2/2022
खेड्यातील तरुणांमध्ये खेळाडू वृत्तीची जोपासना व्हावी, खेळाच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगार निर्माण व्हावा, तसेच विविध खेळाच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साधने हा या क्रीडा आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. याचमुळे तरुणाईत उत्साह निर्माण होऊन गावात चैतन्याचे वातावरण निर्मिती होत असते. कबड्डी हा सांघिक स्वरूपात खेळला जाणारा खेळ असून त्यातून खेळाडूंमध्ये एकोपा जोपासला जातो तसेच सांघिक भावना वाढीला लागत असते. त्यामुळेच खेडोपाडी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात येते. त्याच धर्तीवर वरोरा तालुक्यातील वडगाव येथील जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने दोन दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या कबड्डी सामन्यांचे उदघाटन म्हनून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी बोलतांना रविंद्र शिंदे यांनी आपण स्वतः विद्यार्थी असतांना युवक मंडळातर्फे कबड्डी खेळत असल्याची आठवणी व्यक्त केली. तसेच या खेळामुळे गावाचे नाव व्हावे, तसेच उपस्थित पाहुण्यांचे स्वागत कोणत्या प्रकारे करावे, तसेच खेळाला गालबोट लागू नये याची खबरदारी कमिटीने घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. लोकप्रतिनिधी हा कोण्या एका पक्षाचा नसतो तर पूर्ण समाजाचा असतो त्यांनी कोणत्याही पक्षाचा विचार न करता सेवाभावी वृत्तीने आपले काम केले पाहिजे अशी आशा व्यक्त केली. आपण आपल्या जीवनात झालेल्या चुका दुरुस्त करून नव्याने जीवनाला सुरुवात करावी व आपल्या जबाबदाऱ्या सांभाळावी असे सांगितले.
देशातील सर्वात मोठा उद्दोजक हा शेतकरी असून त्याच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे व लहान शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे. या प्रसंगी बोलतांना त्यांनी ट्रस्ट व बँकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी सहउदघाटक म्हणून दत्ताभाऊ बोरेकर, माजी उपसभापती पं स.वरोरा, कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूजी धोटे, अध्यक्ष तंटामुक्ती समिती वडगाव, नर्मदाताई द. बोरेकार, सरपंच वडगाव, सरलाताई कालेश्वर पेटकर, उपसरपंच वडगाव, प्रकाश कोकांडे, माजी सरपंच वडगाव, अशोक टिपले मुख्याध्यापक वडगाव, गोविंदा ठोंबरे ग्रामसेवक वडगाव, दिलीप पेटकर सामाजिक कार्यकर्त, जोस्नाताई बोरेकर ग्रा.प सदस्य, नलुताई बोरेकार ग्रा.स.,विलासराव बोरेकार संचालक, पुरूषोत्तम ठोंबरे संचालक, बंडूजी तुर्के संचालक, मनोहर कांबळे संचालक, शांताराम पांडे संचालक, विलास कारेकर, संचालक यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment