विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

वरोरा येथे जागतिक कामगार दिन कामगार नेते छोटूभाई यांच्या पुढाकाराने साजरा; शेकडो कामगारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान

वरोरा येथे जागतिक कामगार दिन कामगार नेते छोटूभाई यांच्या पुढाकाराने साजरा; शेकडो कामगारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान

वरोरा, १ मे – जागतिक कामगार दिनानिमित्त कामगार नेते तथा माजी सभापती शेख जैरुदीन छोटूभाई यांच्या पुढाकाराने कामगार चौक, तीन फलका येथे शेकडो कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कामगारांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

कामगार चौकातील तीन फलकाला पुष्पमाला अर्पण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमात नगरपालिकेतील नालीसफाई, घंटागाडी, रोड सफाई व इतर कामगारांना गुलाब देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगर अध्यक्ष गजाननराव मेश्राम, लक्ष्मणराव गमे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे माजी सेवा अधिकारी, नगर उपाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल झोटिंग, माजी नगरसेवक तथा पत्रकार राजेंद्र मर्दानी, नगरसेवक बालू ठावरी, सुनंदाताई जीवतोडे, माजी सभापती पंचायत समिती, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवा अधिकारी रुपलाल कावडे, पारोदे सर, दुगडजी, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक भाई, अली विश्वकर्मा संस्थेचे संचालक धनवलकर, मोहसीन भाई पठाण, बावणेजी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते कामगारांना पुष्पगुच्छ व मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी छोटूभाई यांनी कामगारांना शुभेच्छा देताना मार्गदर्शन करताना म्हटले की, बोगस कामगार नोंदणी थांबवून खऱ्या कामगारांची नोंदणी तातडीने करावी. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरीही कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन व न्याय मिळालेला नाही. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये व ठेकेदारी कामगारांना नियमानुसार वेतन मिळत नाही. बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. दलाल, ठेकेदार व प्रशासनाचे अधिकारी कामगारांची आर्थिक लूट करत आहेत. हे थांबवून कामगारांना नियमानुसार वेतन व सुविधा मिळण्यासाठी जिल्हास्तरावर काही दिवसांत मोठे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहकारी व कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Comments