विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील* *वरोड्यात अजित दादांना सर्वपक्षीय सभेत भावपूर्ण श्रद्धांजली*

*दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील* 

*वरोड्यात अजित दादांना सर्वपक्षीय सभेत भावपूर्ण श्रद्धांजली*

 वरोडा : श्याम ठेंगडी 
     सामान्यांचा कळवळा असणारा माणूस, सामान्यांना आपला वाटणारा, आपल्या घरचा माणूस गेल्याचे दुःख सामान्यांना झाले. अजित पवार यांच्या जाण्याने खचून न जाता, दादांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असून कार्यकर्त्यांनी धीर न सोडता त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्न करावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
      येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 31 जानेवारी रोज शनिवारला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे हे उपस्थित होते.
          कार्यकर्ता घडविणारे, वेळेचे महत्त्व जाणणारे,सहकार क्षेत्रात आपली पकड निर्माण करणारे खंबीर नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक संवेदनशील,कर्तव्यदक्ष व लोकहितासाठी सतत झटणारा नेता गमावला आहे अशी खंत व्यक्त करत आमदार करण देवतळे यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
   खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना, दिलेल्या शब्दाला जागणारा, कामाचा दांडगा अनुभव असणारा व राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील असलेली व्यक्ती आपण गमावली आहे. स्वर्गीय अजित दादांनी चळवळीतून सामान्य माणसाच्या विकासासाठी प्रयत्न केला.त्यांच्या जाण्याने आपण एक सक्षम नेतृत्व गमावले असल्याचे मत व्यक्त केले. 
      या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राकाॅच्या  महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे,बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट गजानन बोढाले, विनायक देवस्थानचे अध्यक्ष राजेश कावलकर भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा भागडे, गांधी उद्यान योग समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नेमाडे, पत्रकार राजेंद्र मर्दाने, व्यापारी संघाचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, उबाठाचे विधानसभा प्रमुख बंडूजी डाखणे, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी यानीही सभेत आपआपले मनोगत व्यक्त करत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. 
सभेनंतर उभे राहत सर्वांनी एक मिनिट मौन पाळून स्वर्गीय दादांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली सभेचे संचालन राखाचे शहराध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांनी केले.

Comments