विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

वरोरा शहरातील नालेसफाई बंद: तत्काळ कारवाई न झाल्यास शिवसेना करणार 'ढोल बजावो आंदोलन'

वरोरा शहरातील नालेसफाई बंद: तत्काळ कारवाई न झाल्यास शिवसेना करणार 'ढोल बजावो आंदोलन'

वरोरा, : शहरात नगरपरिषद वतीने गेल्या आठवड्यापासून नालेसफाई बंद असल्याने  शिवसेना पक्षाने तत्काळ कारवाई न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करण्याचा इशारा दिला. शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

शहरात नालेसफाई बंद असल्याने मच्छरांचा प्रजनन स्थळ तयार झाले असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. मुलं, ज्येष्ठ नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद केले. प्रशासन व सत्ताधारी पक्षाची उदासीनता असह्य झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली.त्यामुळे तत्काळ नालेसफाई सुरू करा, कामगार व यंत्रसामग्री उपलब्ध करा, जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करा व नियमित वेळापत्रक जाहीर करा या मागण्या करण्यात आल्या. या मागण्या  मान्य न झाल्यास नगर परिषद प्रशासन व  सत्ताधारी यांच्या विरोधात नगर परिषद कार्यालयात ढोल बजावो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

यावेळी माजी नगरसेवक राजू महाजन, दिनेश यादव, नगरसेवक कुणाल रुयारकर, संदीप मेश्राम, अनिकेत काळे, जावेद शेख, युवासेना शहर प्रमुख चेतन सातपुते, मनीष दोहतरे, सुबोध कुरेकार, आशिष झाडे, विकास गंधारे, राजा थैम व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Comments