विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

पारोधी गावातील नागरिकांनी अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर व जेसीबी पकडले. प्रशासन हदबल, ट्रॅक्टर-जेसीबी वर कारवाई होनार; प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष"कारवाई न झाल्यास चक्काजाम आंदोलन करणार.

पारोधी गावातील नागरिकांनी अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर व जेसीबी पकडले. 
प्रशासन हदबल, ट्रॅक्टर-जेसीबी वर कारवाई होनार; प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष"

कारवाई न झाल्यास चक्काजाम आंदोलन करणार.

वरोरा -भद्रावती 4/2/2026
चेतन लूतडे 

मंजुरीपेक्षा अधिक उपसा; सातपुते यांच्या नावे असलेला घाट विकास धांडे यांच्या ताब्यात; 
गावकऱ्यांच्या तक्रारीवरही प्रशासना8ची उदासीनता

भद्रावती: भद्रावती तालुक्यातील पारोधी गावात नागरिकांनी बुधवारी सकाळी अवैध वाळू उपसा करणारी वाहने स्वतः पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिली. यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आहे. ईरयी नदीतून परवानगीपेक्षा अनेक पटींनी जास्त वाळू चोरून नेण्याचा हा प्रकार असल्याचे स्थानिक ग्रामस्थ आरोप करत आहेत.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, ईरयी नदीवरील पारोधी गावात दत्तात्रेय मंदिराजवळील घाटावरून 1855 ब्रास रेती काढण्याची 2 वर्षासाठी  मंजुरी प्रशासनाने सातपुते यांच्या नावे दिली होती. पारोधी ग्रामपंचायतीनेही यास संमती दर्शविली होती. मात्र, हा घाट प्रत्यक्षात विकास धांडे व त्यांचे सहकारी चालवत असल्याचे गावकऱ्यांनी उघडकीस आणले. या घाटावर सध्या दोन किलोमीटर लांबीची  खोदणी झाली असून, स्टॉक केलेल्या रेतीतूनच दिवस-रात्र वाळूची विक्री चालू आहे.
महत्वाचे म्हणजे, पटवारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आधीच २१०० ब्रास रेती काढण्यात आली आहे, जी मंजुरीपेक्षा जास्त आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, स्टॉक मर्यादेचे उल्लंघन करून नदीतील वाळू काढून स्टॉकमध्ये मिसळण्यात येत होते. गेल्या कित्येक दिवसांपासून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार लिखित तक्रारी केल्या असूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती.

बुधवारी सकाळी  गावकऱ्यांनी एकत्र येऊन अवैध उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर व जेसीबी वाहनांवर थेट हल्ला चढवून घाटामध्ये  अडवली. यावेळी वाळू तस्करांशी बाचाबाचीही झाली. गावकऱ्यांनी ११२ वर कॉल करून भद्रावती पोलिसांना माहिती दिली, परंतु पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केल्याने गावकरी नाराज झाले. त्यानंतर त्यांनी भद्रावती महसूल विभागाचे अधिकारी व पत्रकार बोलावून घेतले. यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला तरी गावकऱ्यांची मागणी होती की, जप्त केलेल्या वाहनांवर व जेसीबीवर कठोर कारवाई व्हावी.

गावकऱ्यांचा आरोप आहे की, अवैध उपसेचे आता नवीन परवानेही दिले जात आहेत, ज्यामुळे 'आधीच काढलेली वाळू पुन्हा कुठून काढणार?' असा प्रश्न उभा राहिला आहे. पारोधी गावातील ही कारवाई स्थानिक स्तरावर नागरिक जागृती आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठीच्या संघर्षाचे प्रतीक ठरली आहे. प्रशासनाने या प्रकरणी त्वरित आणि कठोर कारवाई करून जबाबदारांना न्यायालयासमोर आणण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सदर वृत्त लिहेपर्यंत कारवाई झाली नव्हती. 

Comments