खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, दिनांक ११/३/२०२६: राज्यातील खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शाळांच्या आवारातच पुस्तके, वह्या व गणवेश यांच्या विक्रीतून सुरू असलेल्या नफेखोरीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. वरोरा येथील सेंट ॲन्स पब्लिक स्कूलवर अलीकडेच कारवाई करण्यात आले होती.  राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी शिक्षणाचा पवित्र व्यवसाय बाजूला ठेवून व्यावसायिक नफेखोरीचा मार्ग अवलंबला आहे. शाळेच्या आवारातच पुस्तके, वह्या आणि गणवेशाची विक्री सक्तीची केली जाते. विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: · प...

महामार्गावर रुग्णवाहिका व गस्ती पथके तैनात* *भटक्या जनावरांमुळे होणा-या अपघाताची दखल*

*महामार्गावर रुग्णवाहिका व गस्ती पथके तैनात*
 *भटक्या जनावरांमुळे होणा-या अपघाताची दखल* 

          चंद्रपूर, दि. 08 : राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावरील भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो दखल घेवून महत्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील खालील राष्ट्रीय  महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून त्यावर 24 बाय 7 रुग्णवाहिका तथा गस्ती पथके कार्यान्वित करण्यात आली आहे.  
        वरोरा-वणी या राष्ट्रीय महामार्ग 930 वर गस्त करणा-या वाहनाचा क्रमांक MH-३४, BZ-१४१८ असून गस्तवाहन चालकाचे नाव आशिष बलवान नागपुरे (मो. क्र. 8329592097) आहे. तर जनावरामुळे अपघात झाल्यास या महामार्गावर रुग्ण वाहिका क्रमांक MH-३४ BZ- ३९९३ उपलब्ध आहे. रुग्णवाहिका चालकाचे नाव सौरव बेग  (मो. क्र.9201997286) असे आहे.
गोविंदपूर-राजुरा या NH-३५३ बी या महामार्गावर गस्त वाहन क्रमांक MH-३४, CQ-०१२४ असून गस्तवाहन चालकांचे नाव सुनिल विजय  (मो. क्र. 9507905482, 7748096278) आहे. या महामार्गावर रुग्णवाहिका क्रमांक RJ-२७ PB-२५६८ असून रुग्णवाहिका चालकाचे नाव शिवपाल (मो.क्र. 8878418057) आहे.
         राष्ट्रीय महामार्गावर आढळलेल्या भटक्या जनावरांना, राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधून राज्य शासनाद्वारे प्रस्तापित केलेल्या गौशाला /शेल्टर मध्ये उक्त जनावरांना जमा करण्यासंबंधी कार्यवाही करण्याबाबत संपर्क साधण्याच्या दृष्टीने माहिती आवश्यक आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या गौशाला/ शेल्टर, नियत्रंण कक्ष व गस्ती  पथकाची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी. 
            जिल्हा/ तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षांचे ठिकाण व संपर्क क्रमांक (दुरध्वनी मोबाईल/ई-मेल) गठीत करण्यात आलेल्या गस्ती पथकांचा तपशील (विभागनिहाय), त्यामध्ये -कार्यक्षेत्र, पथक प्रमुख व सदस्यांचे संपर्क क्रमांक, गस्तीचे वेळापत्रक या संदर्भात जारी करण्यात आलेल्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना / कार्यपद्धती असल्यास त्याची देखील एक प्रत पुरविण्यात यावी, जेणेकरून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या संबंधित उद्योजकांच्या गस्ती प्रथकाला समन्वय साधण्यासाठी माहिती पुरविता येईल. सदर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे सतत निरीक्षण असल्याने हा विषय अत्यंत तातडीचा असून आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांनी कळविले आहे.
००००००

Comments