मजरा रै येथे वैयक्तिक शौचालयाचे (ISL) उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रम.स्वच्छता ही निरोगी आणि सन्माननीय जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. आमदार करन देवतळे


मजरा रै येथे वैयक्तिक शौचालयाचे (ISL) उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रम.

स्वच्छता ही निरोगी आणि सन्माननीय जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. आमदार करन देवतळे 

वरोरा 
फक्त बातमी 

ग्रामीण क्षेत्रामध्ये आरोग्य, स्वच्छता आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल म्हणून, GMR वरोरा एनर्जी लिमिटेड (GWEL) ने CSR उपक्रमांतर्गत ३१ मे २०२५ रोजी मजरा रै गावात वैयक्तिक शौचालयाचे (ISL) उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांशी जुळवून घेण्याचा GWEL चा एक भाग असल्याचे सांगितले आहे.

ISL चे उद्घाटन भद्रावती वरोरा विधानसभेचे आमदार माननीय श्री करण संजय देवतळे, सीओओ थर्मल GWEL श्री धनंजय देशपांडे आणि ग्रामपंचायत सरपंच श्री राकेश बोढे यांच्या उपस्थितीत पार पड़ला हा कार्यक्रम GWEL च्या विविध विभागांचे प्रमुख, गावातील लाभार्थी, बचत गट (SHG), मजरा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

GWEL CSR ने गेल्या ७ वर्षात १४ गावांमध्ये १०२४ वैयक्तिक शौचलयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे उघड्यावर शौचास जाण्याची सवय मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ८ गावे पूर्णपणे उघड्यावर शौचास मुक्त झाली आहेत. GWEL CSR दरवर्षी सरासरी १५० शौचालये बांधण्याचे आणि बहुतेक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. या वर्षी GWEL CSR ने ७ गावांमध्ये १५० ISL पूर्ण केले आहेत आणि त्याचे उद्घाटन श्री करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे व त्याचप्रमाणे मजरा रै आणि मजरा खुर्द ग्राम पंचायतीला प्रत्येकी २५ शौचालये सुपूर्द करण्यात आली आहेत. अशा प्रकारे गेल्या तीन वर्षात दोन्ही गावांमध्ये GWEL ने प्रत्येकी ७५ वैयक्तिक शौचालये बांधली आहेत.

या प्रसंगी बोलताना, श्री. करण देवतळे यांनी भर दिला की, "स्वच्छता ही निरोगी आणि सन्माननीय जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. गावे उघड्यावर शौचास मुक्त करण्यासाठी आणि दीर्घकालीन बदलाला चालना देण्यासाठी शौचालये बांधल्याबद्दल आणि स्वच्छता कार्याबद्दल त्यांनी GWEL चे कौतुक केले आणि गावकऱ्यांना त्याची योग्य काळजी घेण्याचे आणि वापरण्याचे आवाहन केले. GWEL च्या CSR कार्यक्रमांद्वारे गाव विकासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली."

कार्यक्रमादरम्यान, ग्रामीण भागातील २०० हून अधिक ग्रामस्त, लाभार्थी, सरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते आणि स्वच्छतेप्रती त्यांची वचनबद्धता दर्शविली व GWEL चे आभार मानले.

Comments