विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*अहिल्यादेवी होळकर या लोकमातेच्या कृतीचा आदर्श ठेवत समाजाचे प्रश्न सोडविणार:आ. करण देवतळे*

*अहिल्यादेवी होळकर या लोकमातेच्या कृतीचा आदर्श ठेवत समाजाचे प्रश्न सोडविणार:आ. करण देवतळे* 

*आमदारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे भूमिपूजन*

*टेमुर्डा येथे येथे अहिल्यादेवी होळकर  जयंती*

वरोडा, श्याम ठेंगडी सर

         लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीदिनाचे औचित्याने टेमुर्डा येथे नुकताच जयंती व भूमीपूजन सोहळा पार पडला. 
     पदमश्री डॉ. विकास महात्मे माजी राज्यसभा खासदार असताना टेमुर्डा येथे अहिल्यादेवी  होळकर स्मृती सभागृहास संमती मिळाली होती. कोरोनानंतर बांधकामास १०० लाख रु. निधी मंजूर असून आमदार करण देवतळे  याचे हस्ते टेमुर्डा येथिल ग्रामस्थांचे बहुसंख्य उपस्थितीत सभागृहाचे भूमीपूजन करण्यात आले. 
       या कार्यक्रम प्रसंगी प्रसंगी गावात  वाजत गाजत, भजन, दिंडीसह मिरवणूक काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी व राष्ट्रसंत तुकोजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे उदघाटन आमदार करण देवतळे व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी वरोडा तालुक्यातील  राज्यपुस्कार प्राप्त महिला कर्मचारी विद्या गिलबिले,खरखेडे व नंदना बरडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच आचार्य  पदवी प्राप्त डॉ. श्रुती ढाले, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग वर्ग २ परीक्षा उत्तीर्ण  कृतिका झाडे तसेच नीट परीक्षेत गुणवत्तेत  तुमगाव येथील संदीप येडे यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटक आमदार करण देवतळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे लोककल्याणकारी कार्य; दुरदर्शपणा, धर्मरक्षकता देशाला व जगाला प्रेरणा देणारी असल्यामुळे संपूर्ण भारतासह जगात अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक, लोकमाता म्हणून गौरविण्यात येते. अशा लोकमातेच्या कृतीचा आदर्श ठेवत जगणाऱ्या समाजाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहून प्रलंबित असणारे माझे स्तरावरील प्रश्न सोडविण्याचा विश्वास देवून शिस्तबद्‌ध नियोजनाब‌द्द‌ल आयोजन समितीचे कौतूक केले.
      समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य गजानन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य वामन तुर्के, पशुधन अधिकारी डॉक्टर सतीश अघडले, धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव आस्कर, जिल्हाध्यक्ष रमेश बुचे, माजी जि.प. सदस्य सुरेश टेकाम व प्रा. संजय बोधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
          महाराष्ट्र शासनाने भटक्या विमुक्त तसेच दुर्बल घाटकांसाठी घोषित शासकिय योजनांचा लाभ विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
       या प्रसंगी अहिल्यादेवी जन्मोत्सव समिती तर्फे आमदार करण देवतळे यांचा धनगरी घोंगडे व काठी देऊन सत्कार करण्यात आला.
       पंडित लोंढे यांनी कार्यक्रमाचे संचालन तर मारोतराव झाडे यांनी प्रास्ताविक केले.शंकरराव तुराळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास झिले, दिलीप तुराळे, राकेश भोयर, उमेश खातेकर,डॉक्टर अनिल झिले, रमेश भुतकर, भाऊराव तुराळे,राजीव बरडे, राजीव झिले,दिलीप तुराळे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Comments