विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

पात्र लाभार्थीच्या घरकुलांची कामे रखडली : माजी आमदार सुभाष धोटेंचे तात्काळ कार्यवाहीसाठी जिल्हा प्रकल्प संचालकांना पत्र.

पात्र लाभार्थीच्या घरकुलांची कामे रखडली : माजी आमदार सुभाष धोटेंचे तात्काळ कार्यवाहीसाठी जिल्हा प्रकल्प संचालकांना पत्र. 

राजुरा (ता.प्र) :-- प्रधानमंत्री आवास योजना सन-२०२४-२५ मध्ये जिल्ह्यात हजारो गोर-गरीब गरजू लाभार्थाना घरकुल मंजुर आहेत. घरकुलाची कामे सुरू करण्यासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात येत आहे. मात्र मंजुर पात्र लाभार्थापैकी अनेक लाभार्थाचे गेली बरेच दिवसापासून अकाऊंट वेरीफीकेशन असूनसुद्धा पंचायत समिति स्तरावर ऑर्डर शीट ला नाव दिसत नसल्याने लाभार्थाना प्रथम हप्ता वितरित करण्यास अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सदर गंभीर बाब लक्षात घेऊन पात्र लाभार्थ्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा प्रकल्प संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         घरकुल पात्र लाभार्थीची यादी आपले कार्यालयास पंचायत समिति स्तरावरून आपणाकडे पाठविण्यात आली आहे. आधीच घरकुलाची कामे सुरू करण्यास विलंब झालेला आहे. अनेक लाभार्थीनी घरकुल मंजुर झाल्याने आपली जुनी घरे काढून जागा खाली केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घराअभावी गोर-गरीब लाभार्थाचे हाल होणार आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर तांत्रिक अडचनिचे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने आपले स्तरावरून कार्यवाही करण्यात येऊन ज्या लाभार्थाचे Account Verify आहेत. मात्र Order Sheet ला नाव दिसत नसल्याने घरकुलाची कामे रेंगाळलेली आहेत.तरी अशा लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करून घरकुल बांधकामास सुरुवात करण्याबाबतचे निर्देश तात्काळ देण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


Comments