विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

**कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेत गँगवार : एकोणा खाणीत दोघे गंभीर जखमी; सात जणांवर गुन्हा*

**कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेत गँगवार : एकोणा खाणीत दोघे गंभीर जखमी; सात जणांवर गुन्हा**  

वरोरा : प्रतिनिधी

 चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणा कोळसा खाणीत कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेतून गँगवार झाल्याची धास्तीकारक घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोघे व्यावसायिक गंभीर जखमी झाले असून, वरोरा पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ जून रोजी दुपारी साडेचार वाजता एकोणा कोळसा खाणीच्या एमएसएफ चेकपोस्टजवळ घडली.  

घटनेचा क्रम
भद्रावती तालुक्यातील माजरी-एता नगरचे रूपचंद राजबहादूर यादव (३२) हे रोहीत कॉर्पोरेशन आणि रोहन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने कोळसा वाहतूक व्यवसाय करतात. ४ जून रोजी ते त्यांच्या सहकारी राहुल ठाकूर यांच्यासोबत **एमएच २९ एडी ६९०१** या कारने खाणीच्या वाहतूक व्यवस्थेची निरीक्षणे करून परत जात होते. तेवढ्यात एमएसएफ चेकपोस्टजवळ एका 
पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच २९ एआर ३८१८) मधून  प्रतिस्पर्धी कोळसा वाहतुकीतील काहीजण त्यांनी राहुल ठाकूरवर शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या हल्ल्यात रूपचंद यादव आणि राहुल ठाकूर गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी बंदूक दाखवून जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला. यानंतर कारने ठोस मारून आपला जीव वाचवित बाजूने कार काढली तेथून वरोरा पोलीस स्टेशन गाठले.  पोलिसांना आपबिती फिर्यादीने सांगितली . यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेडिकल रिपोर्ट अजून पर्यंत मिळाली नसून यादव यांना चेहऱ्यावर चार पाच टाके लागलेले आहेत. त्यामुळे या प्रकरनाची दखल घेत  पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे.
*स्पर्धेमुळे वाढते हिंसाचार* 
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा व्यवसायासाठी झालेल्या स्पर्धेत अनेक वेळा गुंडगिरी, मारामाऱ्या आणि खूनांपर्यंतचे प्रकार घडत आहेत. व्यावसायिक एकमेकांवर वचपा काढण्यासाठी गुंडांचा वापरत असल्याचे आरोप आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांवर गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली असून, आरोपींच्या पकडीसाठी तपास चालविण्यात आला आहे.  

कोळसा वाहतुकीच्या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.  

— **संवाददाता**, वरोरा (चंद्रपूर)
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी से भेट कर अपने कनिष्ठ सुपुत्र ची. श्यामल के शुभ विवाह स्वागत समारोह का आमंत्रण दिया l



Comments