विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

बल्लारपूर मतदारसंघातील मुल आणि राजोली येथील रुग्ण शस्त्रक्रियेसाठी नागपूरला रवाना**आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*

*बल्लारपूर मतदारसंघातील मुल आणि राजोली येथील रुग्ण शस्त्रक्रियेसाठी नागपूरला रवाना*

*आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*

*श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, नागपूर यांच्यावतीने शिबिरांचे आयोजन*

*चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी मोफत मोतिबिंदू नेत्र तपासणी शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या शिबिरांमध्ये तपासणीनंतर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले, अश्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुल येथून ४२ आणि राजोली येथून १६ अशा एकूण ५८ रुग्णांना नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर आणि शालिनीताई मेघे वानाडोंगरी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रुग्णांसाठी शस्त्रक्रियेसाठी नागपूरला ने-आण, निवास, भोजन व इतर सर्व सोयीसुविधांची व्यवस्था रुग्णालयाकडून करण्यात आली असून सर्व उपचार व शस्त्रक्रिया पूर्णतः निःशुल्क असतील. या उपक्रमातून नेत्रदोषित रुग्णांना नवदृष्टी मिळणार आहे.

आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नुकतेच, विसापूर, नांदगाव, हळस्ती, बामणी, कळमना, जूनोना, चीचपेल्ली, अजयपूर, कोठारी, दुर्गापूर, इंदिरा नगर, राजोली आणि मुल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरे पार पडली. या शिबिरांना मोठ्या संख्येने रुग्णांनी आपले नेत्र तपासणी केली.

*आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून हजारो शस्त्रक्रिया*

आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनेक शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच १५ हजार हून अधिक रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Comments