विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*10 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करा**Ø जिल्हाधिका-यांनी घेतला ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानचा आढावा*

*10 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करा*

*Ø जिल्हाधिका-यांनी घेतला ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानचा आढावा*

चंद्रपूर, दि. 18 : राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ हे अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. या अंतर्गत वर्ष 2025 मध्ये राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. या अभियानाच्या पूर्व तयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी आढावा घेतला. तसेच सदर अभियान यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी बापु येलके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मिलिंद रामटेके आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात 42 टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत आणखी वृक्ष लागवड करायची आहे. वन, कृषी, ग्रामविकास, शालेय शिक्षण या विभागांनी जास्तीत जास्त उद्दिष्ट घ्यावे. तसेच इतरही विभागांनी यात चांगले योगदान देऊन ही मोहीम यशस्वी करावी. वृक्ष लागवडीकरीता रोपे कुठून उपलब्ध होऊ शकतात, त्याचे सुक्ष्म नियोजन संबंधित विभागाने करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

*वृक्ष लागवडीची आवश्यकता :* राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आणि वनाच्छादन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात वन आणि वनाच्छादनाचे प्रमाण 21.25 टक्के आहे. जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतुबदलाची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

००००००

Comments