विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*जीएमसी व सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन*

*जीएमसी व सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन*

         चंद्रपूर, दि. 27 मे :  जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, सामान्य रुग्णालय, चंद्रपुर व कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन सामान्य रुग्णालयात साजरा करण्यात आला. उद्घाटक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे,  अध्यक्ष म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, मानसिक रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मनिष ठाकरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर,  उपस्थित होते.

यावेळी डॉ. कांबळे म्हणाले, मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मन स्वस्थ ठेवावे. मनाची व्दिधा मनस्थिती असल्यास मानसिक आरोग्य ढासळते. तसेच चिंता मुक्त जीवन जगावे. डॉ. चिंचोळ म्हणाले, मानसिक ताण तणावात जास्त काळ न राहता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फार चिंताग्रस्त जीवन जगु नये व छोटया छोटया गोष्टीत आनंद मिळवावा. जे आहे त्यात समाधान मानावे. तरच मानसिक आरोग्य व्यवस्थीत राहील. यावेळी डॉ संदीप भटकर, डॉ. सायली दाबेराव, डॉ प्रियंका मून यांनी स्किझोफ्रेनिया आजाराविषयी मार्गदर्शन केले.

मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी कुठेही संकुचित भावना ठेऊ नये. तसेच मानसिक आरोग्यासाठी भारत सरकारव्दारे टेलीमानस राबविण्यात येतो. टोल फ्री क्रमांक. 14416/18008914416 या नंबर वर मोफत मानसिक आरोग्य मार्गदर्शन व सल्ला समुपदेशन 20 पेक्षा अधिक भाषामध्ये करण्यात येते. याचा लाभ सर्व जनतेनी घ्यावा, असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले.

      जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त शासकिय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी पथनाटयातुन मानसिक स्वास्थ विषयक माहिती दिली. समाजसेवा अधिक्षक उमेश आडे व मेट्रन माडवकर व मेट्रन आत्राम यांनी कार्यकमाची धुरा सांभाळली. कार्यकमाचे संचालन अतुल शेंदरे यांनी तर आभार दुर्गाप्रसाद बनकर यांनी मानले. यावेळी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम मधील सूरज बनकर, उपा गजभिये, मित्रंजय निरजंने, रामटेके सिस्टर, सरकार सिस्टर, शासकिय नर्सिंग कॉलेजचे विदयार्थी तथा रुग्ण, कर्मचारी व समाजसेवा विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.


००००००

Comments