कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक,शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती

कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी  योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती चंद्रपूर, दि. 29 : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (माणिकगड सिमेंट) क्षेत्रातील जमिनीच्या संदर्भात बांबेझरी, कुसुंबी आणि नोकारी येथील शेतक-यांनी मांडलेल्या विषयावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने तोडगा काढत आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 29) जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेतकरी तसेच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे कुसुंबी आणि नोकारी येथे प्रशासनाचे अधिकारी, शेतकरी आणि कंपनीच्या प्रतिनधींसमोर जमिनीची मोजणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केले. यावर उपस्थित शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, भुमी अभिलेख जिल्हा अधिक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार ओमप्रकाश गोंड ( राजुरा), रुपाली ...

*पाचगाव (ठा.) येथे बाल सुसंस्कार शिबिर यशस्वीरीत्या संपन्न* विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणारा उपक्रम

*पाचगाव (ठा.) येथे बाल सुसंस्कार शिबिर यशस्वीरीत्या संपन्न* 
विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणारा उपक्रम

वरोरा (ता. २५ मे) – वरोरा तालुक्यातील पाचगाव (ठाकरे) येथे श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर समिती, टेंमुर्डा यांच्या वतीने बाल सुसंस्कार शिबिर उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. हे शिबिर सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आले असून, यावर्षी देखील शेकडो बालकांचा सहभाग लाभला.

१६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून डॉ. बोंडे (गुरुदेव प्रचारक अध्यक्ष) तर प्रमुख अतिथी म्हणून वाल्मिकराव वैद्य (प्रांत सेवाधिकारी), नामदेव काळे, डॉ. अंकुश आगलावे, डॉ. सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराचे आयोजन जनार्दन देठे (प्रमुख मार्गदर्शक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. माणिक डुकरे (व्यवस्थापक), शामराव काळे (अध्यक्ष), हितेश गुगल (उपाध्यक्ष), मनोज ढोके (सचिव) तसेच नियोजन प्रमुख आशिष माणुसमारे, अमित निब्रड, शैलेश खिरटकर, अशोकराव भोंग, रामदास बारतीने, भारत ठावरी, यजमान सातपुते, कवडू आत्राम यांचा मोलाचा सहभाग लाभला.

१६ ते २५ मे २०२४ या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामगीता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समजावून देत, त्यांच्या जीवनमूल्यांचा अभ्यास करून सद्गुणांच्या रोपांची पेरणी करण्यात आली.

शिबिरात विद्यार्थ्यांसाठी प्राप्तस्मरण, सामुदायिक ध्यान, योग व प्राणायाम, भक्ती संगीत, वाद्य प्रशिक्षण (टाळ, खंजिरी, तबला, हार्मोनियम), भजन गायन, संत वाङ्मय अभ्यास, मैदानी खेळ (लाठी-काठी, कुस्ती, कराटे, मल्लखांब, लेझीम), तसेच परिसर स्वच्छता यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी श्री. रविदादा मानव (संचालक, अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी), श्री. ज्ञानेश्वर रक्षक (प्रचारक, गुरुदेव सेवा मंडळ), श्री.महादेव सुरदुसे (पोलीस उपनिरीक्षक, शेगाव), श्री. जनार्धन देठे (अध्यक्ष, ग्राम तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर, पंढरपूर), आणि श्री. सेवकराम मिलमीले (प्रचारक, गुरुदेव सेवा मंडळ) यांची उपस्थिती लाभली.

स्वप्नील कुथे, करण नेवारे, , लोकेश जीवतोडे,नामदेव सातपुते, यश झाडे, गोकुळ आत्राम, अनिकेत ढुकसे,नरेंद्र सातपुते, वेदिका भोयर,शर्वरी मिटकर लावण्या झाडे,रचना आस्वले यांनी प्रशिक्षक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

गावातील नागरिक, स्थानिक पुढारी आणि गुरुदेव सेवा मंडळ यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करत शिबिरार्थ्यांसाठी मोफत भोजन व नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरला असून, भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागात सातत्याने घडावेत, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Comments