विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

खरीप हंगामपुर्वी शेतकऱ्यांना विज कनेक्शन द्या : किशोर डुकरे यांची मागणीलोंबकळलेल्या वीज तारा दुरुस्त करा

खरीप हंगामपुर्वी शेतकऱ्यांना विज कनेक्शन द्या : किशोर डुकरे यांची मागणी

लोंबकळलेल्या वीज तारा दुरुस्त करा

चंद्रपूर : खरीप हंगाम काही दिवसांवर आला असता हा शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे, ही माहिती तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते किशोर डुकरे यांना मिळतात त्यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अभियंता नवघरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

वीज कनेक्शन कापण्याची पुढील कारवाई थांबवण्यात यावी अन्यथा पिढीत शेतकऱ्यांना घेऊन आमरण उपोषण केल्या जाईल असा इशारा पण त्यांनी दिला आहे. तसेच आज ५०- ६० वर्षात अगोदर गाव खेळामध्ये विज जोडणी केलेली आहे,

मात्र कधी त्या ठिकाणचे जोडणी केलेले पोल जंगलेले आहे, तर वीज जोडणी तारा लोंबकळलेल्या आहे. यामुळे गाव खेड्यात कधी अपघात होऊ शकतो याकडे संबंधित विभागाचे लक्ष द्यावे अशी मागणी सुध्दा त्यांनी यावेळी केली आहे. यामध्ये वरोरा तालुक्यातील ७२ शेतकरी असून या शेतकऱ्यांवर वीज वितरण कंपनीमुळे होणाऱ्या कारवाईमुळे मोठे संकट उभे राहणार आहे तरीपण या शेतकऱ्यासोबत सदैव उभा राहील. यासाठी आंदोलन करणार असल्याचे तालुक्याचे शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी दिला आहे.



Comments