चिकणी बोपापुर रोडवरती रेल्वेचे गेट बंद केल्याने गावकऱ्यांच्या अडचणीत वाढ.

चिकणी बोपापुर रोडवरती रेल्वेचे गेट बंद केल्याने गावकऱ्यांच्या अडचणीत वाढ. 

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोपापुर या गावातल्या दैनंदिन अडचणीत रेल्वेने भर टाकली असून शेतकऱ्यांचे शेतीचे कामे प्रभावित झाली आहे. 
                शिक्षक बाबाराव आगलावे 

चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे प्रशासनाचे तिसरी रेल्वे लाईन नवीन बांधकाम सुरू केल्याने बऱ्याच अडचणींना  सोमोरे  जावे लागत आहे . बऱ्याच ठिकाणी जाण्या येण्यासाठी असणारे पूलाखालचे मार्ग बेमुदत कालावधीसाठी बंद केल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. वरोरा शहरातील बरेच मार्ग याच पद्धतीने बंद आहे. रेल्वे प्रशासनाने हे काम खाजगी कंपनीला दिली असून हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंग करून नागरिकांना जाणे येणे करावे लागत आहे. यामध्ये बऱ्याच लोकांचा जीव सुद्धा गेला आहे. खेडेगावात लहान मुलाना जीव मुठीत धरून शाळेमध्ये जाणे येणे करावे लागत आहे. लोकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर रेल्वे प्रशासनाच्या कामात अडथळा करू शकत नाही असे उत्तर अधिकारी देत आहे. किंवा रेल्वे प्रशासनाचे पोलीस पाठवून लोकांना त्यांच्या मागणीपासून भरकटवले जात आहे.
ज्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी साधा फलक सुद्धा लावण्यात येत नाही. किंवा त्या ठिकाणी सुरक्षाकर्मी राहत नाही. नवीन निर्माण कार्याच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे जनप्रतिनिधीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
चिकणी बोपापुर या मार्गावरील जाण्या येण्यासाठी व शेती कामासाठी असणारा एकमेव मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने शाळकरी विद्यार्थी व शेतमजूर यांना जाण्या येण्यासाठी तात्पुरता खोदलेल्या रेल्वे पूला खालून जाणे येणे करावे लागत आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बरेच पाणी साचणार असून चिखलातून जाणे येणे गावकऱ्यांसाठी कठीण ठरणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
यावेळी शिक्षक बाबाराव आगलावे यांनी रेल्वे प्रशासनाला गावकऱ्यांतर्फे हा मार्ग पूर्वत सुरू करावा अशी मागणी केली आहे.
______________________________________
. happy birthday bhau 

*मित्रांना सूचना*
      *बियांचे संकलन सुरू झाले आहे*
 *या सामाजिक कार्यास आपले योगदान द्या.*
       पर्यावरण क्षेत्रात छोटेसे योगदान म्हणून आम्ही फळ आणि फुलझाडांच्या बिया संकलित करण्याच्या संकल्प केलेला आहे यास नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
        काही नागरिकांनी बिया संकलित करून माझेपर्यंत पोहोचविल्या देखील आहे. श्रीयुत अरविंद जवदंड यांनी मोठ्या प्रमाणात बिया संकलित करून माझेकडे जमा केलेल्या आहेत. 
आपणही या उपक्रमासाठी बिया संकलित केल्या असतील, तर त्या माझेपर्यंत पोहोचविता येत असतील तर पोचवाव्यात किंवा (९२२६१३५२४०) या क्रमांकावर कळवावे.आम्ही त्या घ्यायला येऊ आणि त्याचे वितरण तरुण भारत या वर्तमानपत्रासोबत वाचकांना करण्यात येणार आहे...
*या विधायक सामाजिक कार्याचा आपणही एक हिस्सा बनून या.....*
   घरोघरी, परिसरात यानिमित्याने झाडे लागतील...
*कृपया सहकार्य करावे..*
            श्याम ठेंगडी 
       वरोडा तालुका प्रतिनिधी,
       तरुण भारत

Comments