वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*जिल्ह्यातील 25 शेतकरी जाणार बाहेर राज्यातील प्रशिक्षणाकरीता**राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान*

*जिल्ह्यातील 25 शेतकरी जाणार बाहेर राज्यातील प्रशिक्षणाकरीता*
*राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान*                     
चंद्रपूर, दि.12 : जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान 2024-25 करीता राज्याबाहेरील प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी कृषी विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाकरीता शेतकऱ्यांनी  अर्ज  करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. 
           शेतकऱ्यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्याबाहेरील प्रशिक्षणाकरीता हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात मधुमक्षिका पालनाला असलेले महत्व लक्षात घेता मधमाशा वनस्पतीच्या परगीकरणात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे  पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिक अनेक फायदे आहेत. उत्पन्न आणि  रोजगार निर्मिती, शेतकरी आणि बिगर शेतकरी कुटूंबाच्या चरितार्थाला हातभार, फलोत्पादनाच्या उत्पादनात वाढ आणणे, यासाठी मधुमक्षिका पालन उद्योगात वाढ होण्यास  मदत होत. त्यामुळे मधुमक्षिकापालन काळाची गरज आहे. 
सदर प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास जे शेतकरी/मधुमक्षिकापालक मधुमक्षिका पालनात स्वारस्य दाखवतील तसेच अनुसूचित जाती/ अनूसूचित जमाती आणि महिलांना प्रथम  प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसांचा राहील. राज्याबाहेरील प्रशिक्षणासाठी लाभर्थ्यास इंग्रजी अथवा हिंदी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लगणारा खर्च लाभार्थी शेतकऱ्यांना स्वत: करावा लागेल. लाभार्थी शक्यतो 18 ते 65 वयोगटातील असावे. 
        प्रशिक्षणाकरीता शेतकऱ्यांनी 18 फेब्रुवारी 2025   पर्यंत संबंधित  तालूका कृषि अधिकारी यांच्याकडे सातबारा, 8 अ-, आधारकार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शकंर तोटावार यांचे वतीने करण्यात आले आहे. 
०००००

Comments