75 वरोरा भद्रावती विधानसभेत भाजपाचा विजय काँग्रेसच्या चुकीच्या उमेदवारामुळे झाल्याची चर्चा.


75 वरोरा भद्रावती विधानसभेत भाजपाचा विजय  काँग्रेसच्या चुकीच्या उमेदवारामुळे झाल्याची चर्चा.

माजी मंत्री हंसराज अहिर विजयाचे शिल्पकार.

अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे ठरले बाजीगर.

आदिवासी माना समाजासाठी वरोरा विधानसभेत नवीन नेतृत्व उदयास.

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 
75वरोरा भद्रावती विधानसभेत निवडणुकीपूर्वीच राजकारण तापलेले होते. यामध्ये राष्ट्रीय पक्षाची तिकीट घेण्यासाठी बऱ्याच नेत्यांनी आपले नशीब अजमावले होते. परंतु भाजपातर्फे करण संजय देवतळे आणि काँग्रेस तर्फे प्रवीण सुरेश काकडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. भाजपातून बंडखोरी करीत एहेतेशाम अली यांनी प्रहार कडून लढण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे माना समाजातील नेतृत्व करणारे राजू गायकवाड यांनी भाजपासोबत बंडखोरी करीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस मधून उमेदवारी न मिळाल्याने स्वर्गीय खा.बाळूभाऊ धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी वंचित आघाडी तर्फे व डॉक्टर चेतन खूटेमाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. 

या विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप करीत ही निवडणूक 20 तारखेला पार पडली होती. यानंतर 23 तारखेला निकाल जाहीर होताच राजकारणी नेत्यांनी आपल्या चुका लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. 
यामध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिल्याने या विधानसभेमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. त्यामुळे कुणबी समाजामध्ये पाठिंबा देण्यासाठी नवीन उमेदवार शोधण्यात आला या समीकरणांमध्ये मुकेश जीवतोडे अपक्ष उमेदवारास अघोषित पाठिंबा समाजातर्फे देण्यात आला. या पहिले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असल्याने संघटन व रणनीती मजबूत होती. त्यामुळे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुकेश जीवतोडे यांच्याकडे वळले. त्याचाच फायदा या निवडणुकीमध्ये झाला. या निवडणुकीमध्ये दुसरे स्थान मिळवित ते हरले . तरी वरोरा भद्रावती विधानसभेचे "बाजीगर" ठरले .
वंचित पक्षाचे उमेदवार अनिल धानोरकर भद्रावतीचे शिवसेनेचे नगराध्यक्ष राहिले आहे. त्यांनी स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांना निवडून आणणचा दावा सुद्धा केला होता. काँग्रेस तर्फे सक्षम उमेदवार असण्याचा दावा करीत उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी राजकारणाच्या खेळीतली बळी ठरली. वंचित पक्षाची तिकीट मिळाल्यानंतर खूप काही ते करू शकले नाही. वरोरा भद्रावती विधानसभेत बूथ प्रमुख सुद्धा दिसले नाहीत. प्रचाराचा सुद्धा अभाव दिसला. निवडणुकीमध्ये घरातील वाद समोर आले त्यामुळे निवडणुकीमध्ये ते सुद्धा काहीच करू शकले नाही. याचा फायदा मुकेश जीवतोडे यांना मिळाला.
भाजपाचे बंडखोर नेते राजू गायकवाड यांनी माना समाजातील नेतृत्व उभे केले असून "गरिबाचे लेकरू" या नावाने विधानसभेमध्ये प्रसिद्ध झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने आदिवासी माना समाजाला एक नवे नेतृत्व मिळाले आहे. 
भाजपाचे बंडखोर नेते एहेतेशाम अली यांनी प्रहार पक्ष तर्फे उमेदवारी दाखल करीत आपली रणनीती या क्षेत्रात तयार केली. नगराध्यक्षाच्या अनुभव असल्याने संघटन मजबूत केले. मुस्लिम समाजातील बहुतांश मतदार त्यांच्या पाठीशी होते. त्याचबरोबर त्यांचा नैतिक मनमिळावू स्वभाव, व्यापारी दृष्टी, पारखी नजर, सामाजिक भान असलेले नेतृत्व , मधुर वाणी असलेले उमेदवार अली यांनी "टायगर अभी जिंदा है" या फिल्मी टायटल प्रमाणे या विधानसभेत आपला धबधबा निर्माण केला आहे.

या क्षेत्रातील काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांनी आपली दावेदारी दाखल केल्यानंतर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा चेहरा पुढे करण्यात आला. राजकीय रणनीतीप्रमाणे शेवटी हल्ला करायचा व युद्ध जिंकायचे असे ठरले होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेला. तोपर्यंत समाज आणि पदाधिकारी दूर गेले होते. याचा फायदा अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना मिळाला.
शेवटी वरोरा भद्रावती विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार करण संजय देवतळे यांची रणनीती मजबूत ठरली असेच म्हणावे लागेल. माजी मंत्री हंसराज अहिर यांनी उमेदवारास स्वतंत्रता दिली होती. बाकीची रणनीती पदाधिकारी आखत होते. या सर्वांवर माजी मंत्री हंसराज अहिर यांचे नियंत्रण होते. संजय देवतळे यांच्याच रणनीतीप्रमाणे घराघरात जाऊन स्वतंत्र परिवारास भेटी दिल्या. आपल्या समाजाचा कोणताही उहापोह न करत आपल्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला. भाजपाची रणनीती व संघाचे काम व मित्र पक्षांची मजबूत पकड यामुळे विधानसभेतील मतदार कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता कमळ या चिन्हावरती कायम राहिले. त्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभेतील उमेदवार करण देवतळे कमळ या चिन्हावरती पहिल्यांदा निवडून आले आहे. या विजयाचे शिल्पकार हंसराज अहिर ठरले असून जिल्ह्याचे पुढील राजकीय नेतृत्व अहिर यांच्याकडे आलेले आहे असे दिसते.


या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या नाराजगीचा काहीही फरक पडलेला दिसला नाही. मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पडला. मतदारांनी बऱ्याच उमेदवाराकडून पैसे घेतले. मात्र मतदारांनी सुद्धा आपल्याच मताचा कौल दिल्याचा समजते. पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडणूक हाताळली. त्यामुळे विधानसभेची निवडणूक सुरळीत रित्या पार पडली.

75 वरोरा भद्रावती विधानसभा
 फेरी 25
1)करण देवतळे,भाजपा  65180
2)प्रवीण काकडे, काँग्रेस 24985
3)प्रवीण सुर, मनसे 2043
4)सागर वरघने 1239
5)अनिल धानोरकर 8914
6)अहेतेशाम अली 20569
7)जयंत काकडे 541
8)बारके कवडू 240
9)अतुल बनकर 376
10)डॉक्टर खूटेमाटे 5069
11)तारा काळे 485
12)प्रवीण खैरे 629
13)मुकेश जीवतोडे. 49628 अपक्ष
14)मूनेश्वर बदखल 791
15)राजू गायकवाड 13233
16)विनोद  खोब्रागडे 1103
17)श्रीकृष्ण दडमल 921
18)सुभाष ठेंगणे 399
19)Nota 1029
 *25 फेरी नंतर भाजपचे करण देवतळे विजयी*
----------------------------------------------------




Comments