शेतकर्‍यांच्या विविध समस्या घेऊन गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते धडकले उपविभागीय कार्यालयातपीक विम्याची रक्कम व पांदन रस्त्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन 200 गावातील 600 गुरुदेव सेवा मंडळांच्या कार्यकर्त्याची उपस्थिती वरोरावरोरा ,भद्रावती तालुका हा चंद्रपुर जिल्ह्यात सर्वात जास्त महसुल देणारा तालुका आहे. जिल्हा खनिज विकास निधीतुन मिळणारा निधी शहरावर खर्च केला जातो. हा निधी शहरावर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांचा कणा असलेल्या पांदन रस्त्यावर खर्च करावा. जेणेकरून शेतकर्‍यांना मरण यातना सहन कराव्या लागणार नाही. तर मागील वर्षी येलो मोझ्याक रोगाने हाती आलेले सोयाबीन चे पीक हातातून गेले. याची दखल घेत शासनाने सरसकट सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मंजूर केली. मात्र अजूनही शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. या दोन्ही मागण्या घेऊन बुधवारी वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात 600 गुरुदेव भक्त उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले व उपविभागीय अधिकारी यांना शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले.

शेतकर्‍यांच्या विविध समस्या घेऊन गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते  धडकले उपविभागीय कार्यालयात

वारी प्रबोधनाची कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

वरोरा
चेतन लुतडे 

वरोरा ,भद्रावती तालुका हा चंद्रपुर जिल्ह्यात सर्वात जास्त महसुल देणारा तालुका आहे. जिल्हा खनिज विकास निधीतुन मिळणारा निधी शहरावर खर्च केला जातो. हा निधी शहरावर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांचा कणा असलेल्या पांदन रस्त्यावर खर्च करावा. जेणेकरून शेतकर्‍यांना मरण यातना सहन कराव्या लागणार नाही. तर मागील वर्षी येलो मोझ्याक रोगाने हाती आलेले सोयाबीन चे पीक हातातून गेले. याची दखल घेत शासनाने सरसकट सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मंजूर केली. मात्र अजूनही शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. या दोन्ही मागण्या घेऊन बुधवारी वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात 600 गुरुदेव भक्त उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले व उपविभागीय अधिकारी यांना शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. 
वरोरा भद्रावती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा खदानी आहे मागील 50 वर्षापासून कोळसा व रेती उत्खननाचे काम सुरु आहे. आणि जिल्याच्या खनिज विकास निधीमध्ये (रॉयल्टी) या दोन तालुक्याचा फार मोठा वाटा आहे. परंतु शेतकऱ्याच्या जमिनी कोळसा खाणीसाठी अधिग्रहन करण्यात आल्या. परंतु दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे पांदन रस्ते अजुनही 10% सुध्दा झाले नाही. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना शेतात मशागतीला व पेरणी करायला जाण्यासाठी मरणयातना सहन कराव्या लागतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जिल्हयाचा रॉयल्टीचा (खनिज विकास निधीचा) मोठा वाटा दोन्ही तालुक्यावर खर्च करुन तो निधी पांदन रस्त्यावर खर्च करावा. व तसा आराखडा तयार करुन जिल्हाधिका-यांना देण्यात यावा. त्याचप्रमाणे ज्या शेताला शासकीय पांदन रस्ता नाही अशा शेताला कलम 143 नुसार तहसिलदारांनी लगतच्या दोन्ही शेतकऱ्यांच्या धुऱ्यावरुन पलीकडच्या शेतकऱ्याला येण्याकरीता आदेशीत करुन रस्ता खुला करणे बंधनकारक आहे. परंतु दोन्ही तालुक्यातील अनेक अर्ज अजुनही प्रलंबीत आहे. आदेश झाले तरी रस्ता खुला करण्यात येत नाही. याबाबतीत सुध्दा तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनांतून करण्यात आली
तर दुसर्‍या निवेदनात म्हटले आहे की गेल्या वर्षी येलो मोझ्याक नावाच्या रोगाने वरोरा व भद्रावती या  दोन्ही तालुक्यातील हाती आलेले सोयाबीनचे पिक हातातून गेले.याची दखल घेत  शासनाचे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पिकविम्याची रक्कम मंजूर केली परंतु आजपर्यंत वरोरा तालुक्यातील नऊ हजार शेतकऱ्यांचे व भद्रावती तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांचे अजुनही पिकविम्याचे पैसे शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले नाही. निवडणुकीची आचारसंहीता लागण्यावर हा पिकविम्याचा विषय तसाच मागे पडेल त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे टाकण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा ही इशारा निवेदनातून देण्यात आला .   यावेळी वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते दादा झाडे, किशोर पुंड ,सुधाकर जिवतोडे,मधुकर उरकांडे, गुलाब धानोडे, अर्चना जिवतोडे , विमल पिजदूरकर, , सोमेश्वर आत्राम, एन पी राव, अरुण बुरकुटे, सूरज चौधरी सह अनेक गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते . 
गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

 वरोरा येथील गांधी उद्यान मध्ये  गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा चे आयोजन करण्यात आले होते . यात वारी प्रबोधंनाची या रथ यात्रेच्या माध्यमातून गावागावात असलेल्या समस्या निर्देशनात आल्या . त्यावर काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा करण्यासाठी  200 गावातील प्रत्येकी तीन अशा सहाशे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला .त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक शेतीला पांदण रस्ता झाला पाहिजे यासाठी चळवळ उभी करणे,पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावे,गाव खेड्यात चालणारे  अवैध्य धंदे बंद करावे,गावा गावात व्यसन मुक्ती अभियान राबविणे ,शेतकऱ्यांना शेत पिकामध्ये बदल करून उस लागवडी साठी प्रवृत्त करणे,जेणेकरून शेतकरी सुखी होतील.इत्यादी बाबीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झाले .  
अध्यात्मक गुरुकुल चे संचालक  रविदादा मानव,हभप गव्हाळे महाराज, नरेंद्र जिवतोडे ,आकाश ताविडे, प्रदीप पाल महाराज, आशिष माणूसमारे महाराज, तालुका प्रचारक  जनार्धन देठे, माणसं कारखान्याचे अधिकारी गेडेकर काळेकर, वाल्मीकराव वैद्य, कांचनीचे सीईओ बालाजी धोबे, प्रवीण सुराणा, प्रवीण धनवलकर, मीनाताई किन्नाके चारगाव, धानोली सरपंच शोभा खाडे, सह असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
__________

Comments