खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*सतरा वर्षे अल्पवयीन मुलीचा विनयभंग**तीन आरोपी अटकेत*

*सतरा वर्षे अल्पवयीन मुलीचा विनयभंग*

*तीन आरोपी अटकेत*

अतुल कोल्हे भद्रावती - 
               शहरातील मुर्लीधर पाटील गुंडावार लॉन परिसरापासून शाळेत जाणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना दिनांक २१ रोज बुधवार घडली या प्रकरणी दिनांक २२ तारखेला मुलीच्या तक्रारीवरून तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
यातील मुख्य आरोपी सुरज जांबुळे वय २३ वर्ष , विकास  ढोक २१ वर्ष, आदर्श धाडसे वय २२ असे आरोपींची नावे आहे . कोलकत्ता त्यानंतर बदलापूर येथील चार वर्षीय मुलीचे अत्याचार प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असताना भद्रावती शहरात १७ वर्षे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारला घडली अल्पवयीन मुलगी व मुख्य आरोपी सुरज एकाच गावचे रहिवासी आहेत अल्पवयीन मुलगी एका खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्याकरता निघाली असता दुचाकी वरती तिघे जण आले व सुरज जांभुळे  यानी मुलीला माझ्याशी का बोलत नाही म्हणून तिचा हात पकडला भयभीत झालेल्या मुलीने पळ काढला असता तिचा पाठलाग केला ही घटना मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितली त्यानंतर दिनांक २२ ला भद्रावती पोलिसांनी तक्रार करण्यात आली. यातील तिन्ही आरोपीवर कलम ७४ व ७८ गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम करीत आहे.


Comments