आता एकच लक्ष राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकासआघाडी पदाधिकारी मेळावा संपन्न*
*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकासआघाडी पदाधिकारी मेळावा संपन्न*
*मेळाव्यात राज्याचे पुढील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे च होतील यासाठी एकच निर्धार सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मिळून करण्यात आला.*
वरोरा
चेतन लुतडे वरोरा
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकासआघाडी पदाधिकारी मेळावा १६ ऑगस्ट २०२३ ला षणमुखांनद सभागृह, मुंबई येथे पार पडला. महाराष्ट्र राज्यात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीतील घटक पक्षाने एकजुटीने जनतेसमोर जावुन महाविकासआघाडीत उमेदवाराचा विजय संपादीत करुन महाराष्ट्र राज्यात सुरु असलेला महायुतीचा व गद्दारांचा भोंगळ कारभार, राज्यातील मोठे उद्योग सतत गुजरात व ईतर राज्यात नेण्याचा धंदाच भाड्याने जमवलेल्या पक्षाने लावला आहे. त्यामुळे अश्या असंवेदनशील व घटनाबाह्य सरकारला राज्याबाहेर हद्दपार करण्यासाठी व जनतेच्या हितासाठी, राज्यात खरी लोकशाही नांदवण्यासाठी पुन्हा एकदा पक्षप्रमुख व राज्याचे कुटुंबप्रमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर विराजन करण्यासाठी राज्याच्या २८८ विधानसभेतील कोणताही मतदार संघ हा महाविकासआघाडीच्या मित्र पक्षाला सुटला तरी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकारी यांनी मनात कोणतीही शंका न बाळगता राज्यात आता एकदा पुन्हा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हावे, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत.
या मेळाव्यात राज्याचे पुढील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे च होतील यासाठी एकच निर्धार सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मिळून करण्यात आला.
Comments
Post a Comment