शिवसेनेचे सामाजिक कार्य वरोरा व भद्रावती तालुक्यात सातत्याने सुरू


 शिवसेनेचे सामाजिक कार्य  वरोरा व भद्रावती तालुक्यात सातत्याने सुरू असुन पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील  जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहण कुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात  वरोरा भद्रातील विधानसभा क्षेत्रात शिवसैनिक जनतेच्या सेवेत सतत  कार्यरत आहे.

रुग्णालय मध्ये रुग्णाना जाण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)  “शिवालय”या वाहन रुग्णालय मध्ये नेण्यात आले. पाऊस सुरू असल्याने रुग्णालयात उपचारासाठी गरोदर महीलेला दाखल करायचे होते
दळणवळणाची साधणे उपलब्ध नसल्याने त्याकडे तात्काळ विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांनी जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे यांच्या सूचनेनुसार तात्काळ शिवालय या वाहनाने रुग्णालयात दाखल केले.  रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे यांचे आभार व्यक्त केले. 
युवासेना विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र सज्ज
तसेच पाऊस आल्यामुळे औधोगीक प्रशिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांला वेळेवर पोहचविण्यात आले  व लोकमान्य विद्यालय येथील विद्यार्थ्यांंना वाहनाने सोडण्यात आले.

Comments