विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

७० राजुरा विधानसभा जिल्हा चंद्रपुर सास्ती इथे महात्मा गांधी तंटा मुक्ती अध्यक्ष निवडणुकी वर शिवसेना (उबाठा) गटाचा झेंडा🚩

७० राजुरा विधानसभा जिल्हा चंद्रपुर 

सास्ती इथे महात्मा गांधी तंटा मुक्ती अध्यक्ष निवडणुकी वर शिवसेना (उबाठा) गटाचा झेंडा🚩

चंद्रपूर 

आज दिनांक 28.08.2024 ला ग्रामपंचायत सास्ती  च्या वतीने आम सभा घेण्यात आली. सदर आमसभेत सास्ती ग्रामस्थांनी भाग घेवुन अनेक जनहितार्थ प्रश्न मार्गी लावले.
  त्यासोबतच सास्ती ग्रामपचायत व्दारा तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकी मध्ये  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षा कडून श्रीनिवास दारला तर शेतकरी संघटना व भाजपा युतीचे आनंद मांडवकर हे उमेदवार यांनी भाग घेतला असता आमसभेत उपस्थित ग्रामस्थाने एकतर्फी प्रचंड बहुमताने शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे श्री श्रीनिवास दारला यांचा तंटामुक्ती अध्यक्षपदी विजय करुन शेतकरी सघंटना व भाजपा युतीचे आनंद माडंवकर यांचा पराभव केला.सदर निवडणुकीत जिल्हाप्रमुख रविद्र शिदे यांनी सास्ती ग्रामपचायत येथील सर्व शिवसैनिक, सहकारी व पदअधिकारी यांना एकत्रित करुन व विश्वासात घेवुन तटामुक्ती अध्यक्ष निवडणुकीत समोर जाण्यास मुठबाधली व त्यामुळे एकतर्फी विजय संपादन करता आला. हा विजयश्री खेचुन आण्याकरीता  शिवसेना जिल्हाप्रमुख रवीभाऊ शिंदे यांचे मार्गदर्शनात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या श्रीमती सरिताताई कुडे माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री जीवन भाऊ बुटले, श्री.नरसिंग भाऊ मादर (जिल्हा समन्वयक शिव आरोग्यसेना मा.पंचायत समिती सदस्य राजुरा),युवासेना उपजिल्हा प्रमुख मा. उपसरपंच कुणाल कुडे यांचे नेतृत्वात बबलू कुशवाह ,भास्करजी चौधरी , संतोष कुडे,कृष्णा कोरम, बालाजी रच्चावार, मधुकर झाडे ,महेंद्र नळे,मुरारी बुग्गारप, विलास भटारकर. गणेश चेन्ने,शंकर पेटकर लक्ष्मी नल्ली, वसंताबाई जेट्टी, राजू नरड, सागर लोहबडे,प्रवीण बंडे, काँग्रेसचे बाळू रोगे,नदीम शेख आणि समस्त शिवसैनिक  व महाविकास आघाडी चे सदस्य गावकरी मडळी यांनी अथक परिश्रम घेतले. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षी तर्फे सपुर्ण सास्ती गावकरी मडळीचे व आमसभेत उपस्थिताचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच तटामुक्ती नवनियुक्त अध्यक्ष श्री श्रीनिवास दारला यांचे अभिनंदन करण्यात आले.   

Comments