विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*मनपाच्या तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*मनपाच्या तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 13 :  ‘हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत चंद्रपूर शहर महानगर पालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने मनपाचे अधिकारी - कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.  

मंगळवारी सकाळी 10.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथून महापालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त श्री. पालीवाल म्हणाले, घरोघरी तिरंगा अभियानात आतापर्यंत शहरात 30 हजार ध्वजांचे वाटप करण्यात आले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी, प्रत्येक दुकानात व विविध आस्थापनेत तिरंगा लागावा, असे आवाहन त्यांनी केले.

सदर दुचाकी रॅली प्रियदर्शनी चौक ते वरोरा नाका, सावरकर चौक, बंगाली कॅम्प, परत सावरकर चौक, प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट, बागला चौक ते अंचलेश्वर गेट असे मार्गक्रमण करीत मनपा कार्यालय, गांधी चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

 रॅलीत आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा नगर विकास सहआयुक्त विद्या गायकवाड, अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांनी दुचाकीवर स्वार होत सहभाग नोंदविला. याप्रसंगी भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची तिरंगा शपथ घेण्यात आली. तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले. विविध वाहनांना तिरंगा रथ बनविण्यात आले होते. भारतमाता तसेच विविध महात्म्यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थी उपस्थित होते. तसेच उपस्थितांनी येथे लावण्यात आलेल्या कॅनवासवर जय हिंद, भारत माता की जय लिहून अभियानास समर्थन दर्शविले.      

याप्रसंगी शहर अभियंता विजय बोरीकर, नगर रचनाकार सुनील दहीकर, सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, सचिन माकोडे, संतोष गर्गेलवार, डॉ.नयना उत्तरवार, रवींद्र कळंबे, अतुल टिकले, आशिष भारती, डॉ.अमोल शेळके, नागेश नित, रफीक शेख, सोनू थुल, भूपेश गोठे, संजय टिकले, भुषण ठाकरे, डॉ.अश्विनी भारत,आशिष जीवतोडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments