विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त*

*सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त*

अतुल कोल्हे भद्रावती : 
              येथील सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना वाणिज्य विभागातील व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयात गोंडवाना विद्यापीठातर्फे नुकतीच आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे.

जनता महाविद्यालयातील प्रा. डॉ. फुलचंद निरंजने यांच्या मार्गदर्शनात 'चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड (WCL) उद्योगामधील कंत्राटी कामगारांच्या (वर्ग ड) आर्थिक व सामाजिक स्थितीचे अध्ययन' (कालावधी २०११ ते २०२०) या विषयावर उच्च शिक्षण व संशोधन केंद्र, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले. 

सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

त्यांनी या यशाचे श्रेय मार्गदर्शक, संशोधन केंद्र, जनता महाविद्यालय तथा सरदार पटेल महाविद्यालय येथील प्राध्यापक वृंद, आप्तस्वकीय तथा मित्रमंडळी यांना दिले आहे.


Comments