विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

माढेळी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न.

*माढेळी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न.*

चेतन लुतडे वरोरा 

वरोरा-चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन  माढेळी येथे दिनांक ११ ऑगस्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते. या शिबीराला माढेळी ,पवनी,जळका,येवती,वाघनख,सोईट,निलजई,आमडी,
बोरी,पांझुर्णी, या गावातील १०००नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.

 या कार्यक्रमाचे उदघाटन मा.देवानंद महाजन,सरपंच माढेळी यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख मा.गणेश माटे,सरपंच बोरी,मा.प्रदिप पाल उपसरपंच आमडी,मा.वनिताताई हुलके उपसरपंच, माढेळी. मा.सुगंधाताई बोढाले सामाजीक कार्यकर्ता जळका  हे मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक संकेत गोहकार. संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन कुणाल तुराणकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय चंद्रपूरची सर्व टिम व संदिप सोनेकर,प्रशांत बोढाले,भास्कर मोर्हुले,कीशोर जगताप,रामभाऊ ताजणे,नितेश बोढाले,कार्लेकर,प्रविण वासेकर,शुभम चिमूरकर,भोजराज ठाकरे,ब्रम्हानंद कुळसंगे,ग्राम पंचायत माढेळी व  ग्रामस्थांनी  अथक प्रयत्न केले.

जाहिरात 

श्रमिक पत्रकार संघातर्फे प्रथम क्रमांकाचा ग्रामीण वार्ता पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, मत्स्य व संस्कृतिक मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार  यांच्या हस्ते दैनिक पुण्यनगरीचे वरोरा तालुका प्रतिनिधी *अनिल पाटील* यांना प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

Comments