संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न वरोरा, ३० एप्रिल – स्थानिक संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग (नर्सरी ते युकेजी) साठी पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अपेक्षा मालू होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्या राणी पटेल, उपप्राचार्या श्रद्धा चौबे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती शास्त्रकार यांनी केले. या समारंभात विद्यार्थ्यांना एक-एक करून स्टेजवर बोलावून त्यांना डिग्री सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन पालकांसह सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी आपल्या पाल्यांना डिग्री ड्रेसमध्ये पाहून भावी इंजिनियर, डॉक्टर, जिल्हाधिकारी या रूपात अनुभवले, त्यामुळे सर्वच उत्साही झाले. प्राचार्या राणी पटेल यांनी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन उज्वला झंजल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सारिका दातारकर, भाग्यश्री फेतफुलवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

माढेळी व इनर्व्हिल वरोरा तर्फे पशुसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळेचे आयोजन

माढेळी व इनर्व्हिल वरोरा तर्फे पशुसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय  राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळेचे आयोजन 

वरोरा माढेळी
चेतन लुतडे वरोरा 
दिनांक 15/08/2024 रोजी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 , माढेळी व इनर्व्हिल क्लब ऑफ वरोरा तर्फे पशुसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय  राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळेचे आयोजन , पशुपालकांना विविध योजना विषयी माहिती, पशु पालकांना वैरण बियाणे वाटप व शेती उपयोगी अवजारे याची वितरण करण्यात आले. 
कार्यशाळेचे मुख्य उद्देश राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पुष्पलकांमध्ये उद्योजकता निर्माण व विकास करणे हे होते. 
कार्यशाळेचे उद्घाटन सौ. दिपाली माटे, अध्यक्ष, इनरव्हील क्लब ऑफ वरोरा.  यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यशाळेचे अध्यक्षस्थन माननीय डॉ. देवेंद्र भाऊ महाजन सरपंच माढळी यांनी भूषवले,कार्यशाळेत प्रमुख अभिकृती व पाहुणे म्हणून डॉ. दिलीप देशमुख , सहाय्यक आयुक्त तालुका लघु पशुचिकित्सालय वरोरा डॉ. माधवी गोंगले, पशुधन विकास अधिकारी माढेळी व डॉ. राहुल शेंदरे पशुधन विकास अधिकारी 
(विस्तार )पंचायत समिती वरोरा यांनी भूषवले.
  त्याचप्रमाणे महेश देवतळे ग्रामपंचायत सदस्य, राजूभाऊ सवयी ग्रामपंचायत सदस्य, अमोल भाऊ काटकर ग्रामपंचायत सदस्य, बाळूभाऊ ढेंगळे सामाजिक कार्यकर्ते, अजयजी कटाईत ग्राम विकास अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमात प्रामुख्याने इनरव्हील क्लब वरोराच्या सौ. स्नेहा जौदंड, उपाध्यक्ष.  सौ.सुचिता पदमावार कोषाध्यक्ष , सौ.किरण जाकोटीया cc.,  तसेच सौ कविता बाहेती, सौ. सीमा लाहोटी, आणि सौ.नीलिमा गुंडावार या उपस्थित होत्या.

सदर कार्यशाळेत एकूण 110 पशुपालकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे संचालन डॉ. राहुल शेंदरे
 यांनी केले. सदर तालुकास्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता डॉ. दिलीप देशमुख, डॉ. राहुल शेंद्रे, डॉक्टर माधवी गोंगले, यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्री नागेश ठोंबरे, पशुधन पर्यवेक्षक सोइट, श्री धनराज मेश्राम सहाय्यक पशुधन विकास अधिकारी चिकणी यांचा नियोजन करण्यामध्ये मोलाचा वाटा होता. 
त्याचप्रमाणे सदर कार्यशाळेमध्ये 50 गोपालकांना वैरण बियाणे वाटप व ठोंबे वाटप, गोचीड गोमशा निर्मूलन औषधी, जंतरनाशक वाटप व इनरव्हिल तर्फे शेती उपयोगी अवजारे वाटप करण्यात आली. 
 कार्यशाळेची सांगता व आभार प्रदर्शन डॉ. माधवी गोंगले यांनी केले.



Comments