विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धा*

*विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे जिल्हास्तर अजिंक्यपद  योगासन स्पर्धा*

अतुल कोल्हे भद्रावती :-

                  स्थानिक भद्रावती येथे जिल्हास्तर अजिंक्यपद  योगासन स्पर्धा विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि पतंजली योग समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने   दिनांक 28 जुलै 2024 रोज रविवार ला सकाळी 8.00 वाजता पासून सुरु होणार आहे, तरी या स्पर्धेला चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त योगासन खेळाडूंनी सहभाग घ्यावा या स्पर्धेतून राज्यस्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचा संघ निवडला जाईल  महाराष्ट्र राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धेकरिता संगमनेर येथे ध्रुव ग्लोबल स्कूल दिनांक 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2024 दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याचा संघ पाठवण्यात येणार आहे तरी 28 जुलै 2024 रोजी होणार चंद्रपूर जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धेकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आव्हान चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि समन्वयक यांनी केले आहे.

.       टॉवर मॅन वैभव डहाणे सोबत जिल्हाप्रमुख

Comments