विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा**ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी*

*पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा*

*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी*

*चंद्रपूर, दि.१३ - राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मुदत ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवावी, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.*
काही दिवसांपूर्वी ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिक विम्याच्या संदर्भात आदेश दिले होते. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४’ साठी तातडीने शेतकऱ्यांचा विमा करा, असे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून त्यापूर्वी कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पण ही मुदत आता ३० जुलैपर्यंत वाढविण्याची मागणी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

‘राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकातील उत्पन्नात होणारी घट रोखण्यासाठी शासन पीक विमा योजना गेल्या कित्येक वर्षापासून राबवित आहे. यावर्षी देखील शेतकरी पिक विमा योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. पण पीक विमा नोंदणीची मुदत १५ जुलैपर्यंत दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या हेतूने ३० जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढवावी,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Comments