वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे : ज्योती मोरे

विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे : ज्योती मोरे 

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा, चालबर्डी, चपराळा, आदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप 

चंद्रपूर, दिनांक २५/०७/२०२४ 
चेतन लुतडे 

विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.  मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी  असे घोडपेठ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा भद्रावतीच्या काँग्रेसच्या महिला तालुका उपाध्यक्षा ज्योती मोरे यांनी म्हटले. 
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा, चालबर्डी, चपराळा, आदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या.  

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात काँगेसचे पदाधिकारी  सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे,  ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप देवगडे, ग्रामपंचायतीचे गटनेते ईश्वर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे,  बल्लारपूर काँग्रेसच्या महिला तालुका तथा सामाजिक कायकर्त्या नाजुका आलाम,  जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा उरकुडे, शिक्षिका वैशाली वडेट्टीवार, शिक्षिका नेत्रा रघाताटे, भावराव बनकर, मदन शेरकी, सुधाकर मोरे, निबाळा येथील मुख्याध्यापिका संगीत धाकते , शिक्षिका पद्मा रंगारी, चालबर्डी येथील मुख्याध्यापक् अनिल मातनकर,   शिक्षिका संगीता, खन्ना, शिक्षक प्रवीण ताजने, प्रवीण थेरकर, राजेश घोडमारे यांचे उपस्थित  भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा,  चालबर्डी, चपराळा, आदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक  शाळांमध्ये बुक वाटप व साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा,  चालबर्डी, चपराळा, आदी येथील शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि,   दिनेश चोखारे याचे हे कार्य अभिमानास्पद असून आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल.  जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.  मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. आपण त्यांच्यावर योग्य वयात संस्कार दिले तर त्यांना गोष्टींची जाणीव होईल. 
वरील सर्व शाळांमध्ये शाळांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप केले.

Comments