विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला**आपत्ती व्यवस्थापनाकडून पोलीस प्रशासनाला कुठलीही मदत नाही*

*आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला*

*आपत्ती व्यवस्थापनाकडून पोलीस प्रशासनाला कुठलीही मदत नाही*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                     तालुक्यातील खुटवंडा येथे आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर दिनांक २८ रोज रविवारला सायंकाळी पाच वाजता खुटवंडा येथील नाल्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अमित पेंदाम, वय 24 वर्षे, राहणार खुटवंडा असे या मृतक युवकाचे नाव आहे.  घटनेच्या दिवशी मुसळधार पावसामुळे सदर नाल्याला पूर आला होता. नाल्याजवळ उभ्या असलेल्या या युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व वाहून गेला. त्याला शोधण्याची मोहीम चार-पाच दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत होती. मात्र पुरामुळे त्याचा शोध लागला नव्हता. अखेर पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याच्या पात्रात आढळून आला. या शोधमोहिमेत आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचा खेद पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुडे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments