विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

19 ते 22 जुलैपर्यंत जिल्ह्याला अलर्ट जारी*

*19 ते 22 जुलैपर्यंत जिल्ह्याला अलर्ट जारी*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 18 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18ते 22जुलै 2024 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 19 जुलै  रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता रेड अलर्ट, 20 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर 21 आणि 22 जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.
जाहिरात
जिल्ह्यासाठी 20जुलै 2024 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत चंद्रपूर जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वारा (तासी 50-60 किमी वेगाने) आणि गडगडाटी वादळाची शक्यता तसेच 21 व 22 जुलै 2024 या कालावधीकरीता चंद्रपूर जिल्‍ह्याकरीता यलो अलर्ट असून या  कालावधीत एक-दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे.  खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा.पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्‍या तारोपासून दूर रहा.

*वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये*

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.           

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

जिल्‍ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घ्‍यावी, असे  आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

०००००००

Comments