निमढेला पर्यटन गेट बनले वाघाचे माहेरघर .

निमढेला पर्यटन गेट बनले वाघाचे माहेरघर .

वरोरा 
चेतन लुतडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत निमढेला गेट पर्यटकांचे आकर्षण केंद्रबिंदू बनले आहे. ताडोबा जंगला मधील  प्राणी पाहण्यासाठी आणि रामदेगी ठिकाणचे सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक भारतभरातून भेट देत आहे. 
वरोरा या ठिकाणावरून 25 किलोमीटर अंतरावर असणारे निंमढेला गेटवर खास करून वाघ बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत आहे. या परिसरात रामदेगी पुरातन मंदिर , बौद्ध स्तूप , तलाव , खळखळणारे झरे आणि उंच उंच डोंगर  यामध्ये वसलेली रामदेगीचे मंदिर पर्यटकांसाठी विलक्षण आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या घनदाट जंगलामध्ये समोरून येणारे वाघ मनाला मोहून जात आहे. मागील काही वर्षांपूर्वी या गेटची निर्मिती करण्यात आली होती. यानंतर या गेटला अलौकिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रामदेगी या परिसरात हमखास वाघ दिसण्याचे ठिकाण असून या ठिकाणी तेरा वाघांची संख्या असल्याचे मत येथील लोक करीत आहे. यामध्ये छोटा मटका, नयनतारा, हजारे गंज, शिवा, शंभू, सोनम अशा बऱ्याच वाघांची नावे वन विभागाने ठेवलेली आहे. याचबरोबर बिबट, बायसन ,चितळ, हरीण, अस्वल, जंगलातील वेगवेगळे पक्षी असे अनेक प्राणी या परिसरात असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात या गेटला भेट देत आहे. त्यामुळे निमढेला गेट हे वाघाचे माहेरघर बनले आहे अशी प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करीत आहे.
या उन्हाळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४४ अंशापर्यंत गेले असून या रखरखत्या उन्हात रामदेगी परिसरात उन्हाळा जाणवत नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी  हे स्थळ हृदय असून महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना व पर्यटकांना या ठिकाणची ओढ लागलेली आहे. या ठिकाणी शिवशंभुचे पुरातन मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार करणे सुरू आहे ‌. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी मूलभूत गरजा फार कमी असल्याने येणाऱ्या पर्यटकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. याच परिसरात चंदई नाला धरण असून या ठिकाणी तलावाची खोलीकरण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे परिसरातील प्राण्यांना या पाण्याचा उपयोग होईल. या परिसरात हॉटेल किंवा रिसोड अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने चिमूर किंवा वरोरा यावरूनच पर्यटकांना यावे लागत आहे. हे ठिकाण सकाळी सहा किंवा दुपारी तीन वाजता आपल्या गाडीने गाठावे लागते. सफारीसाठी हे गेट हाऊसफुलच असते. 
रामदेगी हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अधिन असल्याने सकाळी आठ वाजेपासून पाच वाजेपर्यंत हे ठिकाण भाविक भक्तांसाठी खुले ठेवले जाते. याच ठिकाणी वाघांची संख्या जास्त असल्याने भाविक भक्तांना धोका होऊ नये यासाठी वनविभागाने आपले कर्मचारी तैनात केलेले आहे. 
रामदेगी परिसरात असणारे धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. 

पर्यटकांचा अनुभव 
मुंबईवरून कोळसकर व ठाकरे  परिवार ताडोबा बघण्यासाठी आले होते. दोन-तीन ठिकाणी पर्यटन केल्यानंतर त्यांना रामदेगी गेट ची माहिती मिळाली. या ठिकाणी हमखास वाघाचे दर्शन होईल अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी रामदेगी गाठले. पर्यटन फुल असल्याने नाराजी व्यक्त करत परत मुंबईला जाण्याचा विचार केला होता. मात्र वन विभागातील कर्मचाऱ्यांनी मंदिर सुरू असल्याची बातमी सांगितली. त्यामुळे मंदिरात जाऊन शिव मंदिराचे  दर्शन करावे आणि त्यानंतर परतीचा प्रवास करावा असा बेत आखला.
वनविभागात एन्ट्री करून आत मध्ये जण्याचा प्रवासच सुखदायक होता. आत जाताच वेगवेगळ्या प्राण्यांचे दर्शन व्हायला लागले. गेल्याबरोबर मंदिराचे दर्शन घेतले. वापस येताना गावातील भजन मंडळ सुरेल गात असतानी दिसले. त्यामुळे त्या ठिकाणी बसून भजनाचा आनंद घेत होतो. त्यामध्ये कोणीतरी कुजबुजला वाघ आला ‌. आणि आमचे सगळ्यांचे कान एकदम चौकारले. तिथे सगळेजण बसलेले छोटा मटका वाट बघण्यासाठी कुंपणापाशी जाऊन उभे राहीले . मला मोठा वाघ आमच्या जवळून जात होता. वाघ बघण्याची खरी मजा जंगलातच असते आणि ती काय असते याचा अनुभव स्वतः आमच्या परिवाराने घेतला. हा आनंद मुंबईच्या कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा सिमेंटच्या जंगलात मिळाला नसता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 
यानंतर पुन्हा एकदा वेळ काढून ताडोबाला भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 
पहायला विसरू नका लाईव्ह चंद्रपूर वर.......

Comments