काँग्रेसने मुस्लिम समाजाला भडकवण्याचेच कार्य केले: इद्रिस मुलतानी* *मुस्लिम समाजाचा विकास करणाऱ्या मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्न करा : आवाहन*

*काँग्रेसने मुस्लिम समाजाला भडकवण्याचेच कार्य केले: इद्रिस मुलतानी*
 *मुस्लिम समाजाचा विकास करणाऱ्या मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्न करा : आवाहन* 
वरोडा: श्याम ठेंगडी 
           काँग्रेसने 70 वर्षात मुस्लिम समाजाला भाजपची भीती दाखवून मुस्लिम समाजाची दिशाभूल करून भडकावण्याचेच काम केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कोणतेही ठोस कार्य झालेले नाही.आपल्या फायद्यासाठी मुस्लिम समाजाचा काँग्रेसने वापर करून घेतला.मुस्लिम समाज हा राष्ट्रीय प्रवाहात येऊ नये असाच प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. त्यामुळे आता आपल्या समाजाने काँग्रेसचा हा कुठील डाव ओळखून योग्य निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असे उद्गार भाजप प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी आज वरोडा येथे काढले.
          वरोडा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर असताना ते आज 14 एप्रिल रोज रविवारला वरोडा येथे आयोजित अल्पसंख्यांक समाजाच्या एका सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष अहेतेशाम अली, प्रदेश महामंत्री जुनेद खान, महिला पदाधिकारी रिदा रसीद,रमजान अन्सारी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
         धर्मा-धर्मात भेदभाव न करता मोदी सरकारने सबका साथ, सबका विकास हा मंत्र वापरून खऱ्या अर्थाने सर्वांचा विकास केला आहे. मोदी सरकारच्या योजनांचा लाभ जसा हिंदूंना होत आहे, तसाच तो मुस्लिम समाजालाही होत आहे. आज खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचा विचार करणारा नेता देशाला लाभला आहे.त्यामुळे आपल्या समाजाचा अधिक विकास करण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याची आवश्यकता आहे.यासाठी भाजपच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदीला मत हे सूत्र विचारात घेऊन भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहनही यावेळी इद्रिस मुलतानी यांनी उपस्थितांना यावेळी केले. 
       इद्रिस मुलतानी यांचा यावेळी स्थानिक मुस्लिम समाजातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अहेतेशाम अली यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वरोडा विधानसभा क्षेत्राची परिस्थिती कथन केली व स्थानिक मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा परिचयही करून दिला.
         प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्री जुनेद खान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
सभेला मुस्लिम समाजाचे सलीम सय्यद, इकबाल शेख, फिरोज खान, बशीर शेख, जावेद शेख, रमजान शेख, फहीम काजी, जुबेर कुरेशी, कादर शेख, बाबू शेख यांचेसह शेकडो पुरुष महिला व युवक उपस्थित होते.



Comments