बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

*अखेर… त्या तिघांचेही मृतदेह सापडले**विठ्ठलवाडी परीसरात शोकाकुल वातावरण*

*अखेर… त्या तिघांचेही मृतदेह सापडले*

*विठ्ठलवाडी परीसरात शोकाकुल वातावरण*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                          महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे दर्शणाकरीता गेलेले काही तरुण वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी घडली. विठ्ठलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मित्रांचा समूहच नदी पत्रात उतरले त्यातील तीन तरुण नदीत बुडाल्याची घटना 8 मार्चला सायं.5 वाजताच्या सुमारास घडली. रात्री त्यांचा नदी पात्रात शोध घेतला असता कोणताच थांगपत्ता नदीपात्रात लागला नव्हता. म्हणून 9 मार्च रोजी सकाळीच रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता आधी संकेत पुंडलिक नगराळे याचा मृतदेहच आढळून आला लगेचच अनिरुद्ध चाफले परंतु तिसरा तरुण 9 मार्च ला सायंकाळ पर्यंत शोध घेऊनही हर्षद चाफले हा सापडला नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे नदीचा काठावर तरंगतांना दिसून आला.


शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील मित्र महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे मंदिर दर्शनाकरिता गेले होते. भटाळी वरून परत येतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळीचा मोह सुटला.हे सर्वच मित्र वर्धा नदी पात्रात आंघोळी करीता गेले. दरम्यान आंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षद अतिश चाफले वय अंदाजे १६ वर्ष ,चुलत भाऊ अनिरुद्ध चाफले २२ व  संकेत पुंडलिक नगराळे वय अंदाजे २६ वर्ष हे अंगोळीला उतरले असता त्यातील दिघेही जण वाहून गेल्याची घटना काल दि.8 मार्च रोजी हृदयद्रावक घटना घडली. अखेर सकाळी 9 च्या दरम्यान ता.9 मार्च रोजी रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता खोलवर वाहून गेलेल्या तिन तरुणांपैकी दोघांचे मृतदेहच हाती लागलेहोते.या मयत दोन्ही तरुणांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. त्यातील मयत संकेत नगराळे यांचे पार्थिव शरीर कुटुंबीयांना सोपविण्यात आले व त्याचा पार्थिवावर 9 मार्च रोजी अत्यंसंस्कार विधीही करण्यात आले . 9 मार्च रोजी सायं पर्यंत शोधूनही हर्ष चा मृतदेह सापडलाच नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे हर्ष चा मृतदेह नदीचा काठावर तरंगताना दिसून आला.

त्या हर्ष चा मृतदेहला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले.पुढील तपास वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.

Comments