आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात नैसर्गिक/सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न.

आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात नैसर्गिक/सेंद्रिय शेती प्रशिक्षण  संपन्न.
Warora

       महारोगी सेवा समिती, वरोरा  द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित  आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथे  कृषी महाविद्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, चंद्रपूर (आत्मा) यांच्या संयुक्त विदयमाने परंपरागत कृषि विकास योजना व डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत  "नैसर्गिक/सेंद्रिय शेती" या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन  दिनांक 30 ते 31 जानेवारी  दरम्यान करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी झाले प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. प्रीती हिरळकर, प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चंद्रपूर,  श्री. सुशांत लवटे, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा  उपस्थित होते ,  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार  यांनी भूषविले.
   या प्रशिक्षणांतर्गत शेतकऱ्यांना तज्ञ मार्गदर्शकांमार्फत नैसर्गिक/सेंद्रिय शेतीचे महत्व व व्यवस्थापन, नैसर्गिक/सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, नैसर्गिक/सेंद्रिय शेतीमध्ये मित्र कीटकांची ओळख व संवर्धन, नैसर्गिक/सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांचे महत्त्व व उत्पादन पद्धती, नैसर्गिक/सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या उपाययोजना, सेंद्रिय खतांचा वापर, कार्यपद्धती, सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर, नैसर्गिक सेंद्रिय शेतमाल विक्री व विपणन व्यवस्थापन, सेंद्रिय शेती उद्योजकता विकास व शेतकरी उत्पादक कंपनी, इत्यादी संबंधित मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रक्षेत्र भेट तसेच प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील  ता. भद्रावती येथील 40 शेतकरी प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
     समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. कवडे, कृषि सहाय्यक ता. भद्रावती, बि.टी.एम. हिवसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण  केले.
    प्रशिक्षणाचे मुख्य समन्वयक डॉ. आर. व्ही. महाजन, समन्वयक डॉ. एस. आर. इमडे यांनी सदर प्रशिक्षणाचे आयोजन केले. सह समन्वयक डॉ. व्ही. व्ही. पाटील तथा सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या विभाग  यांनी कार्यक्रमांचे संचालन केले तसेच प्रशिक्षणाच्या  यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

Comments