विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : किशोर टोंगे**मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन*

*गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : किशोर टोंगे*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन* 

वरोरा 
 शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी अचानक गारपीटसह मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे ९०% रब्बी पिक हातातून गेले आहे. ही नुकसान भरपाई पंचनामे करून तात्काळ द्यावी यासाठी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते, सामाजिक कर्यकर्ते किशोर टोंगे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी ते म्हणाले की, यापूर्वीच माझ्या वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझाक रोगामुळे पुरता संकटात होता त्यात हे गारपीट आमच्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे असून त्यांना अधिक संकटात नेणारा हार्दिक अवकाळी धक्का असं ते म्हणाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण

यासाठी तातडीने दोन्ही तालुक्याच्या तहसीलदारांनी यंत्रणेमार्फत तातडीने नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व पंचनामे पूर्ण करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

शनिवारी रात्री अचानक वादळाला सुरवात झाली व अचानक गारांसह पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांचे हरभरा, गहू व तूर या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात व परिसारत वृक्ष कोसळले आहे. यात अनेक गावांचा व शेतपंपाचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला असून तो पूर्ववत करण्यात यावा असंही ते म्हणाले. 

प्रशासनाने तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.


Comments