विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भद्रावतीत**नामांकित क्रिकेटपटू होणार सहभागी*

*राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भद्रावतीत*

*नामांकित क्रिकेटपटू होणार सहभागी*

अतुल कोल्हे भद्रावती :-

            लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे स्वर्गीय पंजाबराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय t20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ते 18 फेब्रुवारी पर्यंत पिपराडे मैदान चंद्रपूर -नागपूर रोड येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेत देशातील जबलपूर, लखनऊ, इटावा, बेंगलोर तेलंगणा तसेच राज्यातील जळगाव, नागपूर ,चंद्रपूर येथील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा  समावेश असणार आहे.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस दोन लाख अकरा रुपये तर द्वितीय एक लाख 11 हजार रुपये तसेच शील्डअसणार आहे. सोबतच व्यक्तिगत बक्षीस सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक सात फेब्रू .ला सकाळी दहा वाजता होणार असून क्रिकेट प्रेमींनी या राष्ट्रीय स्पर्धेचा आनंद लुटावा असे आवाहन लक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, सुनील महाले, रोहन कुटे माटे ,नकुल शिंदे ,समीर बल्की, प्रशांत शिंदे सचिन सरपटवार यांनी केले आहे.

Comments