नागपूर विजयवाडा सुपरफास्ट महामार्गाचे सर्वे नंबर जाहीर.शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला मिळणार. * जमिनीच्या अधिग्रहणासाठी कार्यवाही सुरू

नागपूर विजयवाडा सुपरफास्ट महामार्गाचे सर्वे नंबर जाहीर.

शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला मिळणार.

 * जमिनीच्या अधिग्रहणासाठी कार्यवाही सुरू

वरोरा 28/2/2024


वर्तमान स्थिती
नागपूर विजयवाडा ब्राउनफील्ड विभागात बांधकाम चालू आहे (खालील कंत्राटदार सूची पहा), तर त्याच्या मंचेरियल – वारंगल – खम्मम विजयवाडा विभागासाठी 7500 कोटींच्या एकत्रित अंदाजित खर्चासह मार्च 2023 मध्ये कंत्राटे देण्यात आली होती.

वरोरा (चंद्रपूर): केंद्र शासनाने मध्य भारताला दक्षिण-पूर्व भागाशी थेट जोडण्यासाठी नागपूर ते विजयवाडा   ४५७ किलोमीटरचा सुपरफास्ट महामार्ग तयार करण्याची योजना सुरू झाली आहे. हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार आहे . सदर प्रकरणी शासनाने अलीकडे अधिसूचना निर्गमित केली असून महामार्गाच्या अंतिम आखणीस अंतिम मान्यता प्रदान केली आहे. आणि यासंदर्भात जमिनीच्या अधिग्रहणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभाग नागपूर यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालयाकडून अहवाल मागितले जात असल्याचे विश्वसनीय माहिती आहे.

भारत ‌इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वेगाने प्रगती करीत आहे. त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणून मध्य भारताला दक्षिण पूर्व भागाशी थेट जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर ते विजयवाडा असा ४५७ किलोमीटरचा सुपरफास्ट महामार्ग तयार करण्याची योजना केंद्र शासनाने आखली आहे. या ४५७ किलोमीटरच्या महामार्ग बांधकामावर १४ हजार ६६६ कोटी रुपये खर्च होणार आहे.
नागपूर ते विजयवाडा इकॉनोमिक कॅरी डोअर चे काम एनएचएआय यांच्या देखरेखीखाली सुरू असून  सर्व कामाचे डिपीआर झाले असल्याचे म्हटले जाते.
हा एनएचएआय द्वारे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातुन संरेखित केलेला चार पदरी रस्ता राहणार आहे.