वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

भाजप महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अहेतेशाम अली*

*भाजप महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अहेतेशाम अली*

वरोरा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी नियुक्त्यांचा धडका लावला आहे. जिल्हा, ग्रामीण अध्यक्षांसह कार्यकारणीची निवड प्रक्रिया रखडली असली तरी राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत. (Bjp News) भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अहेतेशाम अली यांची निवड करण्यात आली आहे.


वरोरा नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा सचिव अहेतेशाम अली यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी मुंबई येथे झालेल्या (Bjp) भाजपाच्या बैठकीनंतर  नियुक्ती केली. अहेतेशाम अली हे गेल्या 9 वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 2016 मध्ये नगरपालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष सह नगरसेवक निवडून आणले होते.
वरोरा नगरपालिकेवर भाजप सत्ता स्थापन यश मिळवलेले होते.

अहेतेशाम अली यांचा कार्यकाळामध्ये वरोरा शहराचा सर्वाधिक विकास झाला. शहरातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले. 
शहरात हायमास्ट लाईट आणि डेकोरेटिव्ह पोल बसविण्यात आले. 
मानवी जीवन निरोगी रहावे म्हणून काही वार्डात वाटर एटीएम बसविण्यात आले. 
वरोरा नगरपरिषदे ला स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळाले होते. 

 अहेतेशाम अली यांच्या वर पक्षाने आता त्यांना बढती देत त्यांच्यावर अल्पसंख्याक आघाडीच्या उपाध्यक्ष पदाची ची जबाबदारी सोपवली आहे. (Maharashtra) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया अहेतेशाम अली यांनी दिली.


Comments